Home ताज्या बातम्या VIDEO: गरजू गावकऱ्यांना सलमान खानचा मदतीचा हात, अभिनेत्याच्या प्रेमाने ग्रामस्थ भारावले |...

VIDEO: गरजू गावकऱ्यांना सलमान खानचा मदतीचा हात, अभिनेत्याच्या प्रेमाने ग्रामस्थ भारावले | News


निघताना सलमान हात जोडून गावकऱ्यांना धन्यवाद असंही म्हणाला. या आधाही त्याने शेकडो कामगारांना मदत केली आहे.

निलिमा कुलकर्णी, मुंबई 03 मे: लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सलमान खान सध्या पनवेलच्या आपल्या फार्म हाऊसवर आहे. कोरोनाचं संकट आल्यापासून सलमान मदतीसाठी पुढे सरसावला. फार्महाऊस जवळच्या खेड्यांमधल्या गावकऱ्यांना त्याने आज अन्न धान्याची मदत केली. या कामात स्वत: सलमान आणि त्याचे सर्व सहकारी सहभागी झाले होते. त्याच्यासोबत त्याची मैत्रीण यूलिया वेंटूर, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस,  बहिण अर्पिता खान आणि काही नातेवाईक तिथे राहत आहेत. त्या सगळ्यांनी मानवी साखळी करून सामानाचं वाटप केलं.

गावकरी आपल्या बैलगाड्या घेऊन फार्महाऊसवर आले होते. त्या सगळ्यांना राशन आणि आवश्यक सामान देण्यात आलं. निघताना सलमान हात जोडून त्यांना धन्यवाद असंही म्हणाला. या आधाही त्याने शेकडो कामगारांना मदत केली आहे.

चित्रपटाच्या सेटवर शुटींगसाठी मदत करणाऱ्या शेकडो कामगारांचं काम सध्या बंद आहे. त्यामुळे त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा कामगारांसाठी त्याने रोख पैसे आणि त्यांच्या राहण्या खान्याची व्यवस्था केली होती.

महाराष्ट्रातला कोरोनाचा वेग कायम आहे. राज्यात आज 678 नवीन रुग्ण आढळून आलेत त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 12974 एवढी झाली आहे. तर आज 27  रुग्णांचा मृत्यू झाला. आज 115 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आतापर्यंत 2115 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. रुग्णांचा मृत्यू आटोक्यात आणण्यासाठी सरकार अटोकाट प्रयत्न करत असून अनेक उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती दिली जात आहे.

मुंबईत आज 441 नवे कोरोना रुग्ण आढळले असून त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 8613 वर पहोचली आहे. म्हणजे राज्यातल्या कोरोनाबाधित 12974 पैकी तब्बल 8613 रुग्ण हे फक्त मुंबईतले आहेत. त्यामुळे मुंबईत जास्त प्रयत्नांची गरज असल्याचं बोललं जातंय.

आज कोरोनामुळे 21 लोकांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत मुंबईत एकूण 343 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 100 जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 1804 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

तर पुण्यात दिवसभरात ९९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली.7 करोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला. करोनाचा संसर्ग झालेले ५५ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण ४५१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. ७५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

First Published: May 3, 2020 11:25 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

madhurta deshmukh: घरबसल्या गोष्टी ऐका आजी-आजोबांकडून – storyteller madhurata deshmukh is present stories for children under spin a yarn india using youtube and facebook

हर्षल मळेकर, मुंबईआजी-आजोबांच्या कुशीत शिरुन कोल्होबा, कावळा, सिंह-उंदिर यांच्या तसेच राम-कृष्णाच्या, बिरबलाच्या गोष्टी ऐकत झोपी जायचे हे भाग्य विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हल्ली फार...

Nitin Bhalerao Martyr: छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव यांना वीरमरण – assistant commandant of crpf nitin bhalerao martyred, 9 injured in naxal...

नाशिक: छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवान नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकाऱ्यासह ९ जवान जखमी झाले...

Recent Comments