Home ताज्या बातम्या VIDEO पाहताना आधी वाटला साप; पुढे जे दिसलं ते पाहून सर्वांना बसला...

VIDEO पाहताना आधी वाटला साप; पुढे जे दिसलं ते पाहून सर्वांना बसला धक्का snake like creature crawling across rock viral video mhpl | Viral


सोशल मीडियावर (Social media) या विचित्र जीवाचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

वॉशिंग्टन, 28 जून : या बातमीचा फोटो जर तुम्ही पाहिला तर तो पाहून कुणालाही असंच वाटेल की हा साप (snake) आहे. तुम्हाला असंच वाटलं ना? मग तुम्हीही चुकलात. खरंतर हा साप नाही तर दुसराच प्राणी आहे. सुरुवातीला पाहिल्यानंतर हा सर्वांना सापच वाटेल मात्र शेवटी हा वेगळाच प्राणी असल्याचं समजचं.

सोशल मीडियावर (social media) सध्या हा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे. ज्यामध्ये एक साप दगडावर सरपटताना दिसला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरुवातीला सर्वांना असंच वाटतं. मात्र व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतर पुढे जे दिसतं त्यानंतर आपल्या डोळ्यांवर विश्वाच बसत नाही. व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्काच बसेल. हा साप नाही तर दुसराच प्राणी आहे.

या जीवाला पाच हात आहेत, जे सापासारखे दिसतात. तो दगडावरून हळूहळू पाण्याच्या दिशेने जात होता. ट्विटर युझर लाइडिया रालेंनी हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि हे काय आहे? असं विचारलं आहे.

हे वाचा – 

हा व्हिडीओ तसा जुना आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात. प्रत्येकाने वेगवेगळ्या जीवाची नावं घेतली. शेवटी हा जीव नेमका आहे तरी कोण हे समजलंच.

एका ट्विटर युझरने सांगितलं हा ब्रिटल स्टार आहे. ज्याला ओफियोरोइड असंही म्हणतात. ब्रिटल स्टार समुद्रात राहणारा जीव आहे, जो स्टारफिशसारखा दिसतो. यांना सरपेंट स्टार्स म्हणूनही ओळखतात. याच्या दोन हजारपेक्षा अधिक प्रजाती आहेत. त्यापैकी बहुतेक खोल समुद्रात सापडतात. आपल्या लांब भुजांचा वापर करून ते समुद्रात पोहोतात.

संपादन – प्रिया लाड

First Published: Jun 28, 2020 10:27 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments