Home ताज्या बातम्या VIDEO: लॉकडाऊनमध्ये अभिनेत्याचा फिटनेस फंडा; जीम नाही तर अशी करतोय एक्सरसाइज actor...

VIDEO: लॉकडाऊनमध्ये अभिनेत्याचा फिटनेस फंडा; जीम नाही तर अशी करतोय एक्सरसाइज actor vidyut jamwal hanged by trees pull ups excercise video viral mhpl | News


मार्शल आर्ट एक्सपर्ट आणि स्टंट परफॉर्मर असलेल्या या बॉलीवूड अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

मुंबई, 29 जून : लॉकडाऊनमध्ये (Lockdown) अनेक सेलिब्रिटींचा फिटनेस (fitness) फंडा तुम्ही पाहिला असाल. कुणी आपल्या घरातील जीममध्ये, कुणी आपल्या घराच्या गच्चीवर व्यायाम केला. तर कुणी योगा केला. फिटनेस म्हटलं की, मार्शल आर्ट एक्सपर्ट आणि स्टंट परफॉर्मर बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवालचं (Vidyut Jammwal) नाव येतंच.

लॉकडाऊनमध्येही आपल्या पिळदार शरीराला मेंटेन करण्यासाठी तो खूप कष्ट करतो. आता लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीही जीममध्ये न जाता  त्याने आपलाफिटनेस  कायम ठेवला आहे. लॉकडाऊनमध्ये न जाता फिटनेस कायम ठेवण्यासाठी त्यांनी एका वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला आहे. तो निसर्गाच्या सान्निध्यात राहून एक्सरसाइज करतो आहे. आपल्या फार्म हाऊसवर एक्सरसाइज करतानाचे व्हिडीओ त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर टाकले आहेत.

या व्हिडीओत आणप पाहू शकतो. विद्युत एका नदीकिनारी एका झाडावर लटकून पुल अप्स करतो आहे. त्याची ही पुल अप्स करण्याची पद्धत सर्वांना भारी आवडली आहे. हा व्हिडीओ पाच लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी लाइक केला आहे.
विद्युतची कमांडो 3 ही फिल्म नुकतीच आली होती. त्यामध्य त्याने जबरदस्त अॅक्शन केल्या गोत्या. फक्त बॉलीवूडच नाही तर टॉलीवूड आणि कॉलीवूड फिल्ममध्येही त्याने काम केलं आहे.

हे वाचा – तुम्हालाच नाही तर तापसी पन्नूलाही विजेच्या बिलाचा बसला शॉक; तिने काय केलं पाहा

तुम्हे दिल्लगी आणि गल बन गई ही त्याची गाणीही हिट झाली होती. त्याला झी सिने अवॉर्ड, आइफा आणि फिल्मफेअर पुरस्कारानेही त्याचा गौरव करण्यात आला आहे.

संपादन – प्रिया लाड

First Published: Jun 29, 2020 07:46 AM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

yeola st depot employees: एसटीचे कर्मचारी पुन्हा करोना बाधित – nashik corona update : 3 yeola st depot employees found corona positive

म. टा. वृत्तसेवा, येवलाएकीकडे येवला तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आटोक्यात येत असताना, दुसरीकडे मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी आपले कर्तव्य बजावून परतलेल्या एसटीच्या येवला...

Bank employees strike: संपामुळे सातशे कोटींचे व्यवहार ठप्प – 700 crore transactions stalled due to strike

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकेंद्र सरकार बँकांचेही खासगीकरण करू पाहत आहे. पीएमसी, एस बँकेच्या ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले. आता तेच लक्ष्मी विलास बँकेचे होऊ पाहत...

Recent Comments