Home मनोरंजन vidya balan ppe kits : वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विद्या बालन देणार १००० पीपीई...

vidya balan ppe kits : वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विद्या बालन देणार १००० पीपीई किट्स – vidya balan pledges to donate 1000 ppe kits to healthcare staff in india


मुंबई: भारतातील काही राज्यांत करोनाचा कहर काही थांबायचा नाव घेईना. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. देशात वेगवेगळ्या रुग्णालयांत १९ हजार ८६८ जणांवर उपचार सुरू आहेत. या करोनाविरुद्धच्या लढ्यात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्याक घालून रुग्णाचे प्राण वाचवत आहेत. त्याच्या सुरक्षेचा विचार करून बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिनं देशातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी १००० पीपीई( पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट ) किट्स देण्याचं ठरवलं आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून तिनं ही माहिती दिली आहे. ‘डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी थेट करोना रुग्णांच्या सहवासात असतात. त्यातील एका जरी वैद्यकीय कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली तर त्या रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना याचा धोका असू शकतो, त्यामुळं हे सर्व वैद्यकीय कर्मचारी सुरक्षित असायला हवेत.त्यासाठी मी १००० पीपीई किट्स देत आहे’, असं तिनं तिच्या व्हिडिओमध्या म्हटलं आहे.

शाहरुखचा २५ हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हात

यापूर्वी अभिनेता शाहरुख खाननं देखील महाराष्ट्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी २५००० पीपीई किट्स दिले आहेत. तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी १०,००० खास क्रॉक्स बुटांचे जोड पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

तर कााही बॉलिवूड सेलिब्रिटींनी करोनाच्या लढ्यासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे. अक्षय कुमारनं २५ कोटींची मदत केली आहे. रितेश देशमुख, हृतिक रोशन, रिचा चढ्ढासह इतर कलाकारांचाही समावेश आहे. कोणी पोटावर हात असलेल्या कामगारांसाठी पुढं आलं आहे तर कोणी गरजू रुग्णाच्या उपचारासाठी मदत केली आहे.

जो पैसा कमावला तुमच्यामुळेच…कार्तिक आर्यनची १ कोटींची मदत

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ajit pawar: Ajit Pawar: ‘मुंबई पोलिसांच्या ‘या’ पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही’ – mumbai terror attacks ajit pawar paid homage to the martyrs

मुंबई: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी नागरिकांचं रक्षण करताना शहीद झालेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी, एनएसजी कमांडो व गृहरक्षक दलातील जवानांचे शौर्य व त्यागाचे स्मरण...

aurangabad News : रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून चार लाख वसूल – four lakh recovered from those who spit on the road

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहर विद्रुपीकरण टळावे, नागरिकांना शिस्त लागावी या उद्देशाने महापालिकेने रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर, रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्या...

ms dhoni: MS धोनी नव्या भूमिकेत; या चित्रपटात करणार मुख्य रोल – ms dhoni will play the lead role in the film

रांची: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आता मनोरंजन क्षेत्रात येणार आहे. धोनीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती...

Recent Comments