Home देश पैसा पैसा Vijay Mallya appeal : Vijay Mallya Extradition Appeal Reject In London High...

Vijay Mallya appeal : Vijay Mallya Extradition Appeal Reject In London High Court – मल्ल्याचे दिवस भरले; प्रत्यार्पण एक पाऊल दूर


लंडन : फरार उद्योगपती विजय मल्ल्याला सोमवारी लंडन न्यायालयात मोठा झटका बसला आहे. लंडन हायकोर्टात मल्ल्याने दाखल केलेला प्रत्यार्पणाविरोधातील अपील फेटाळण्यात आला आहे. आता हे प्रकरण युकेच्या होम सेक्रेटरी प्रीती पटेल यांच्याकडे गेले असून त्यांच्या निर्णयावर मल्ल्याचे भारतातील प्रत्यार्पण अवलंबून आहे.

फेब्रुवारी महिन्यात मल्ल्या याने लंडन हायकोर्टात प्रत्यार्पणाविरोधात अपील दाखल केला होता. त्याची आज सुनावणी झाली. लंडनमधील रॉयल कोर्ट ऑफ जस्टीसचे लॉर्ड जस्टीस स्टीफन आणि जस्टीस एलिसाबेथ या द्विसदस्यीय खंडपीठाने मल्ल्या यांचा अपील फेटाळून लावला.

संधीसाधू गुंतवणुकीला लगाम; चीनसोबत नवा संघर्ष?

प्रथमदर्शनी सिनियर डिस्ट्रिक्ट जज आणि भारतातील सीबीआय, ईडी या तपास यंत्रणांनी या प्रकरणी केलेले दाव्यांमध्ये तथ्य आहे. अनेक मुद्यावर हा खटला योग्य आहे, असे स्पष्ट करत खंडपीठाने मल्ल्याच्या अपील फेटाळून लावला. आता हे प्रकरण युकेच्या गृह सचिव प्रीती पटेल यांच्याकडे गेले असून त्यांच्या निर्णयावर मल्ल्याचे भारतातील प्रत्यार्पण अवलंबून आहे. दरम्यान, मल्ल्याला परत भारतात आणल्यास त्यावरील थकीत कर्ज वसुलीची प्रक्रिया वेग पकडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

करोना विमा दावे : २ तासांत निर्णय घ्या

डिसेंबर २०१८ मध्ये लंडनमधील मॅजिस्ट्रेट कोर्टाने विजय मल्ल्याला भारताच्या ताब्यात देण्याचे आदेश ब्रिटन सरकारला दिले होते. विजय मल्ल्यावर कर्ज थकवणे, मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. विजय मल्ल्याने मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या निकालाविरोधात अपील केले होते.

बँकांची कर्जे बुडवून लंडनमध्ये पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्यावर नऊ हजार कोटींचे कर्ज आहे. त्याने यापूर्वीही कर्ज फेडण्यास तयार असून, भारतात परतणार नसल्याचे म्हटले आहे. ‘किंगफिशर एअरलाइन्सवरील सर्व कर्जाची परतफेड करण्याचा प्रस्ताव मी बँकेपुढे वारंवार ठेवला आहे. परंतु, बँकेकडून पैसे स्वीकारले जात नाहीत आणि सक्तवसुली संचलनालयाकडूनही काही मदत मिळत नाही. त्यामुळे सध्याच्या या संकट काळात अर्थमंत्री माझे म्हणणे ऐकतील,’ असे मल्ल्या याने महिनाभरापूर्वी ‘ट्विटर’वर म्हटले होते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vaccination in india: vaccination in india : करोना लसीकरण; ६०० जणांवर साइड इफेक्ट, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण – side effects surfacing are common...

नवी दिल्लीः देशात १६ जानेवारीला लसीकरण ( vaccination in india ) सुरू झाल्यापासून साइड इफेक्टचे ( side effects surfacing are common ) जवळपास...

जीएसटीचा नियमसंभ्रम; व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीसंबंधी केंद्राने एखादे परिपत्रक काढले, तरी राज्य सरकारच्या स्तरावर त्याचा अभ्यास करून त्यातील नियम बदलले...

ऑस्ट्रेलियातून आलेल्या मुंबईतील खेळाडूंना आयुक्तांनी दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडू आज गुरुवारी मायेदशात परतले. भारतीय संघातील खेलाडू त्यांच्या त्यांच्या शहरात दाखल झाले. पृथ्वी शॉ दिल्लीत, टी नटराजन...

Recent Comments