Home क्रीडा virat kohli: गर्भवती हत्तीणीच्या क्रूर हत्येमुळे विराट कोहली हळहळला.... - virat kohli...

virat kohli: गर्भवती हत्तीणीच्या क्रूर हत्येमुळे विराट कोहली हळहळला…. – virat kohli and rishabh pant reacts after death of pregnant elephant


केरळ ही देवांची भूमी म्हणून ओळखली जाते. पण याच केरळमध्य एक धक्कादायक प्रकार घडला. काही लोकांनी एका गर्भवती हत्तीणीची क्रूरपणे हत्या केल्याचे पाहायला मिळाले. हे पाहून भारताचा कर्णधार विराट कोहली हळहळला आहे.
केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला अननसामध्ये चक्क स्फोटके टाकून खाण्यास देण्यात आली होती. हा अननस खाताच या गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. या घटनेचा देशभरात निषेध होत आहे. त्याचबरोबर कोहली आणि भारतीय संघातील खेळाडू रिषभ पंतनेही या गोष्टीचा निषेध केला आहे. या दोघांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून या दोघांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण या घटनेचा व्हिडीओ पाहणे फार वाईट असल्याचे बऱ्याच जणांनी सांगितले आणि त्यांनी हळहळही व्यक्त केली.
भूकेल्या गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर कोहली म्हणाला की, ” केरळमध्ये जे काही घडले त्याबद्दल मला अतीव दु:ख झाले आहे. प्राण्यांबद्दल लोकांमध्ये ममत्व, प्रेम असायला हवं, असे धक्कादायक प्रकार थांबायला हवेत.” रिषभ पंतने या घटनेनंतर सांगितले की, ” केरळमध्ये गर्भवती हत्तीणीची जी क्रूरपणे हत्या केली, हे धक्कादायक आहे. एवढं निर्दयी कोण कसं असू शकतं. या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा द्यायला हवी.”

नेमके घडले तरी काय…
केरळमधील मलप्पुरम येथे काही निर्दयी लोकांनी गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्‍या मुलासह तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्याने ही वेदनादायक घटना सोशल मीडियावर पोस्ट केली. लवकरच ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोक चांगलेच संतापले.

अन्नाच्या शोधात ही गर्भवती भुकेलेली हत्तीण जंगलातून बाहेर आली. ती अन्नाच्या शोधात खेड्यात फिरत होती. काही स्थानिक लोकांनी तिला अननसाद्वारे फटाके खायला घातले. भुकेने त्रस्त झालेल्या या हत्तीणीने ते अननस खाल्ले. त्यानंतर थोड्याच वेळात तिच्या पोटात फटाके फुटले आणि तिचा मृत्यू झाला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune: धक्कादायक! अंगावरील कपडे उतरवून तरुणाला बेल्टने मारहाण; व्हिडिओही काढला – 36 year old man abducted and beaten by belt in viman nagar pune

म. टा. प्रतिनिधी, पुणे: कर्जाची रक्कम परत न केल्याने तरुणाच्या अंगावरील कपडे उतरवून त्याला पट्ट्याने मारहाण केली. त्या मारहाणीचा व्हिडीओ काढून पैसे न...

nuh: haryana news: ४ मुली मृतावस्थेत आढळल्या, आई तडफडत होती; एका रात्रीत ‘असं’ काय घडलं? – haryana four girls found dead and woman injured...

नूह : हरयाणातील नूह जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील पिपरौली गावात चार मुली मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांचा गळा चिरला होता....

Recent Comments