Home क्रीडा virat kohli: भारतीय संघासाठी 'तो' मैलाचा दगड होता! - virat kohli says...

virat kohli: भारतीय संघासाठी ‘तो’ मैलाचा दगड होता! – virat kohli says 2014 adelaide test an important milestone for team india


नवी दिल्ली: भारताच्या २०१४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अॅडलेड येथे खेळवण्यात आलेला कसोटी क्रिकेट सामना हा भारतीय संघाच्या दृष्टीने मैलाचा दगड होता, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.

वाचा- …आणि या दोघांचे नशीब बदलले!

त्या दौऱ्यामधील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेचा पहिला सामना अॅडलेड येथे ९ ते १३ डिसेंबरदरम्यान खेळवण्यात आला होता. या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये विराटने शतक झळकावले होते. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियाला कडवी लढत दिली होती. तथापि, भारताला या सामन्यात ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला. हा सामना संघ म्हणून आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत, तिथपर्यंतच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा होता. दोन्ही संघांकडून या सामन्यात दर्जेदार खेळ करण्यात आला. आम्ही हा सामना जिंकू शकलो नसलो, तरी आम्ही ठरवल्यास काहीही करू शकतो, हा आत्मविश्वास आम्हाला या सामन्याने दिला, असे विराटने सांगितले.

वाचा- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पराक्रम; स्वत:च्या देशाचे स्पेलिंग चुकीचे लिहले!

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ७ बाद ५१७ धावांवर घोषित केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या डावात ४४४ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ५ बाद २९० धावांवर घोषित करून भारतासमोर विजयासाठी ३६४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव ३१५ धावांत संपुष्टात आला. विराटने या सामन्यामध्ये पहिल्या डावात ११५, तर दुसऱ्या डावात १४१ धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने दोन्ही डावांत शतके झळकावली होती, तर सामनावीर ठरलेल्या नॅथन लायनने एकूण १२ विकेट घेतल्या होत्या. भारताने चार सामन्यांची ही मालिका ०-२ अशी गमावली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BJP: बेस्ट खासगीकरणाविरोधात भाजप आक्रमक – bjp has apposed privatization of best buses and conductor jobs recruitment on contract basis

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई बेस्ट उपक्रमात ४०० बस भाडेतत्त्वावर आणि कंडक्टर कंत्राटी घेण्याच्या निर्णयाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. बेस्टच्या खासगीकरणाच्या डावात...

Recent Comments