Home मनोरंजन Vishal Dadlani tweet: केंद्र सरकार सैन्याचा वापर जनसंपर्कासाठी करतेय: विशाल दादलानी -...

Vishal Dadlani tweet: केंद्र सरकार सैन्याचा वापर जनसंपर्कासाठी करतेय: विशाल दादलानी – fighter jet fly-bys to salute doctors” while doctors are suspended says vishal dadlani


मुंबई: केंद्र सरकार आपल्या सैन्याचा वापर त्यांचा जनसंपर्क सुधारण्यासाठी करतेय, अशा पद्धतीची थेट टीका बॉलिवूड गायक आणि संगितकार विशाल दादलानीनं केली आहे. करोना व्हायरसच्या संकटात सर्वात पुढं राहून करोनावर मात करण्यासाठी अहोरात्र झगडणाऱ्या ‘करोना योद्ध्यां’ना देशाच्या सेनेकडून अनोख्या पद्धतीनं सलामी देण्यात आली. भारतीय हवाईदलाकडून सुखोईसारख्या लढावू विमानांच्या साहाय्यानं देशातील वेगवेगळ्या भागांत कोविड रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. याच गोष्टीवर विशाल दादलानी यानं आक्षेप घेतला आहे.

ट्विट करत विशाल दादलानी यानं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या लष्कराचा गौरवशाली अशा इतिहास आहे. गौरवशाली इतिहास असलेल्या लष्कराचा वापर जनसंपर्काचं माध्यम म्हणून केला जातोय असं त्यानं म्हटलं आहे. ‘ लढावू विमानांच्या साहाय्यानं डॉक्टर आणि रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. पण जे डॉक्टर पीपीई किट्सची कमतरता आहे हे सांगत आहेत त्यांना निलंबीत केलं. आपल्या या वैभवशाली सैन्याचा वापर जनसंपर्कासाठी केला जातोय. कामगार, मजूर त्यांच्या घरी जाण्यासाठी पैसे मोजतायत आणि सरकार अशा गोष्टींवर पैसा खर्च करतेय’, अशा आशयाचं ट्विट त्यानं केलं आहे. विशालच्या ट्विटची सध्या प्रचंड चर्चा सुरू असून काहींनी त्याच्या ट्विटचं समर्थन केलं आहे तर अनेकांनी त्याच्यावर टीका करत करोना योद्ध्यांचं मनोबल वाढवण्यासाठी हे गरजेचं होतं असं म्हटलं आहे.

अदृश्य शत्रूसोबत लढणाऱ्या ‘करोना योद्ध्यां’ना सेनेची सलामी
गेल्या दीड ते दोन महिन्यापासून संपूर्ण देशात करोनानं हाहा:कार माजवला आहे. त्यामुळं गेल्या दोन महिन्यांपासून सर्व वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि सफाई कामगार जीवावर उदार होऊन करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रचंड मेहनत घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हवाई दलाने या कोविड योद्ध्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून अभिवादन केलंय.
कोविड योद्ध्यांना हवाई दलाचं ‘थँक्यू’; मुंबईत सुखोईतून पुष्पवृष्टीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments