Home देश VK Singh: भारतानेही चिनी सैनिक पकडले होतेः व्ही. के. सिंह - ladakh...

VK Singh: भारतानेही चिनी सैनिक पकडले होतेः व्ही. के. सिंह – ladakh face off v k singh on galwan valley clash


नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री आणि माजी लष्कर प्रमुख जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह यांनी गलवानमधील हिंसक संघर्षावर मोठं वक्तव्य केलं आहे. चीनने भारताच्या जवानांना सोडलं तसंच भारताने चीनच्या सैनिकांना परत केलं, असा दावा व्ही. के. सिंह यांनी केलाय. चीनने काही भारतीय जवानांना पकडलं होतं. नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. तसंच भारतानेही चीनच्या सैनिकांना पकडलं होतं. त्यांना परत केलं गेलं, असं व्ही. के. सिंह म्हणाले.

चीनचे दुप्पस सैनिक मारले गेले

गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. पण त्यापेक्षा अधिक सैनिक चीनचे मारले गेले. पण चीन याबाबत माहिती देत नाहीए. चीन प्रत्येक गोष्ट लपवतं. चीनचे दुप्पट सैनिक मारले गेलेत. आपले जवान बदला घेऊन शहीद झाले, असं व्ही. के. सिंह म्हणाले.

पेट्रोल पॉइंट १४ भारताच्या ताब्यात

गलवान खोऱ्यातील जो भाग भारताच्या ताब्यात होता तो अजूनही भारताच्याच ताब्यात आहे. दोन्ही देशातील तणावाचे कारण पेट्रोल पॉइंट १४ हा आहे. हा पॉइंट भारताच्या ताब्यात आहे. गलवान खोऱ्याचा एक भाग भारताच्या ताब्यात आहे तर दुसरा भागा चीनच्या. चीनने १९६२ पासून तिथे कब्जा केला आहे. पण आपणही तिथून मागे हटलेलो नाहीए, असं व्ही. के. सिंह यांनी स्पष्ट केलं. दोन्ही देशाचे सैनिक आपल्या-आपल्या सीमेत होते. पण आपल्या काही जवान तिकडे आणि तिकडचे काही जवान भारतीय सीमेत आले. ही सर्व माहिती जाहीर करण्याची गरज नाही. प्रत्येकाला हे जाणून घेणं आवश्यक नाही, असं सिंह म्हणाले.

बिहार रेजिमेंटचे जवान चिन्यांचा काळ बनले, १८ जणांच्या माना पिरगळल्या

भारत-चीन तणावावरील पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून वाद; PMO कडून स्पष्टीकरण

गलवान खोऱ्याचे महत्त्व

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ (LAC) गलवान खोरे हे सामरीक दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. या भागात एलएसीवर कुठलाही वाद नव्हता. पण चीन आता संपूर्ण गलवान खोऱ्यावर आपला दावा करत आहे. या भागात भारताची स्थिती भक्कम झाल्यास अडचणी वाढतील, अशी चीनला भीती आहे. गलवान सेक्टर अतिशय संवेदनशील आहे कारण एलएसीजवळ डीएस-डीबीओ रोड (दार्बुक – श्योक ते दौलत बेग ओल्डी ) हा तिथे जुळतो.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

it raid: anurag kashyap : अनुराग कश्यप, तापसी पन्नूसह इतरांनी कोट्यवधींची संपत्ती दडवली! – it raid on two production houses anurag kashyap and taapsee...

नवी दिल्लीः दिग्दर्शक अनुराग कश्यप ( anurag kashyap ), अभिनेत्री तापसी पन्नू ( taapsee pannu ) आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने...

Recent Comments