Home विदेश Vladimir Putin: Vladimir Putin पुतीन यांचा दबदबा कायम; २०३६ पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष...

Vladimir Putin: Vladimir Putin पुतीन यांचा दबदबा कायम; २०३६ पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहणार! – vladimir putin wins russia vote that could let him rule until 2036


मॉस्को: रशियन राजकारणात आपले वर्चस्व कायम राखण्यात राष्ट्राध्यक्ष व्लामदिर पुतीन यांना यश आले आहे. पुतीन यांना २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी कायम ठेवण्यासाठी झालेल्या घटना दुरुस्ती मतदानात रशियन जनतेने पुतीन यांच्या पारड्यात मतदान केले आहे. यामुळे आता पुतीन हे सोव्हिएट रशियाचे माजी प्रमुख जोसेफ स्टालिन यांच्यापेक्षाही अधिक काळ सत्तेवर असणारे नेते होणार आहेत.

जवळपास आठवडाभर घटनादुरुस्तीसाठी मतदान सुरू होते. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर मतदान करण्यात आले. यामध्ये ७७ टक्के लोकांनी घटनादुरुस्तीच्या बाजूने आपला कौल दिला. या घटना दुरुस्तीमुळे पुतीन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रत्येकी सहा वर्षाच्या दोन टर्म पूर्ण करता येणार आहे. घटना दुरुस्ती न झाल्यास पुतीन यांचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपुष्टात येणार असून त्यानंतर त्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही.

ही घटना दुरुस्ती मंजूर करण्यासाठी पुतीन यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. भविष्यातील देशासाठी आपण मतदान करत आहोत. आपण आपल्या मुलांकडे एका भक्कम देश सुपूर्द करणार आहोत, या विचारानेच मतदान करण्याचे आवाहन पुतीन यांनी केले होते. पुतीन यांनी जानेवारी महिन्यातच घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर पुतीन यांच्या सूचनेनंतर पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पुतीन यांनी कमी राजकीय अनुभव असणाऱ्या मिखाइल मिशुस्टिन यांच्याकडे पंतप्रधानपदाची धुरा दिली होती. रशियात २००८ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते एलेक्सेई नावालनी यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत पुतीन यांना आव्हान निर्माण केले होते. मात्र, निवडणूक आयोगाने नावालनी यांना एका भ्रष्टाचाराप्रकरणी दोषी ठरवत त्यांच्या उमेदवारीला स्थगिती दिली होती.

वाचा: रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांचा राजीनामा

वाचा: होय…टिकटॉक बंदीमुळे आर्थिक नुकसान; चीनची कबुली

सध्याच्या रशियन संविधानानुसार, पुतिन २०२४ मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीला फक्त दोन टर्म राष्ट्रपती राहता येऊ शकते अशी संविधानात तरतूद आहे. पुतिन यांनी २००० ते २००८ या कालावधीत राष्ट्रपतीपदाची दोन टर्म पूर्ण केली होती. त्यानंतर त्यांनी निकटवर्तीय मेदवेदेव यांना राष्ट्रपतीपदाची धूरा दिली होती आणि स्वत: पंतप्रधान झाले होते. आता घटनादुरुस्ती केल्यानंतर पुतिन यांना २०२४नंतर ही १२ वर्षापर्यंत राष्ट्रपतीपद भूषवण्याची महत्त्वकांक्षा आहे.

वाचा: पोलंडमध्ये अमेरिकन सैन्य तैनात होणार; रशियासोबत तणाव वाढणार!

मतदानावर शंका

व्लामदिर पुतीन हे २००० पासून सत्तेवर आहेत. एका खासगी सर्वेक्षणानुसार, पुतीन यांची लोकप्रियता अद्यापही ६० टक्के आहे. घटना दुरुस्तीसाठी ऑनलाइन मतदान प्रक्रिया घटनात्मक निकष पूर्ण करत नसल्याचा आरोप निवडणुकांवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थांनी केला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

hyderabad rain: ‘हैदराबादमध्ये १०० वर्षांत असा पाऊस पडला नाही’, CM नी केली ‘ही’ मोठी घोषणा – hyderabad had not experienced such heavy rainfall in...

हैदराबादः महाराष्ट्रसोबत तेलंगणमध्ये ( hyderabad rain ) पावसाने प्रचंड नुकसान झाले. महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना अद्याप राज्य सरकारकडून कुठलीही मदत घोषित करण्यात...

Nawab Malik: कोंबडा आरवला नाही तरी सकाळ होते!; फडणवीसांवर राष्ट्रवादीने डागली तोफ – ncp leader nawab malik targets devendra fadnavis

मुंबई: 'कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे', अशी...

Recent Comments