Home देश पैसा पैसा Vodafone idea share price: 'लॉकडाउन'मध्ये टेलिकॉमला अच्छे दिन ; हे शेअर्स करतील...

Vodafone idea share price: ‘लॉकडाउन’मध्ये टेलिकॉमला अच्छे दिन ; हे शेअर्स करतील कमाल – Vodafone Idea Share May Rebound With Better Revenue


मुंबई : नजिकच्या काळात शेअर बाजारात दूरसंपर्क क्षेत्रातील वोडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल हे दोन शेअर चांगली कामगिरी करतील असा विश्वास गुंतवणूक तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महिनाभरात वोडाफोन आयडियाचा शेअर १०० टक्क्यांनी वाढला आहे. तेजीची ही रॅली आणखी पुढे जाईल, अशी शक्यता आहे.

टेलिकॉम कंपन्यांवर सध्या समायोजित एकूण महसूल अर्थात ‘AGR’ची टांगती तलवार आहे.भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया व टाटा टेलिकॉम या कंपन्यांना १.४७ लोक कोटींचा AGR सरकारकडे भरायचा आहे. या ‘AGR’बाबत कंपन्यांना एखादा मोठा गुंतवणूकदार मिळाला किंवा सरकारकडून दिलासा मिळाला तर टेलिकॉम उद्योगाला कलाटणी मिळेल, असे एलिक्सिर इक्विटीज या संस्थेचे संस्थापक आणि शेअर बाजार विश्लेषक दिपान मेहता यांनी सांगितले. ते म्हणाले की सध्या रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूकदारांची रिघ लागली आहे. ज्यांना जिओमध्ये डील करता आले नाही, असे गुंतवणूकदार वोडाफोन किंवा भारती एअरटेलचा पर्याय पाहतील. याचा अर्थ वोडाफोन अद्याप शर्यतीत आहे. जर ‘AGR’बाबत काही दिलासादायक घडले तर नजीकच्या काळात वोडाफोन ही कंपनी सावरू शकते, असे त्यांनी सांगितले. भारती एअरटेलचा शेअर देखील गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे, असे त्यांनी सांगितले.

सराफा बाजारात तेजीची लाट ; सोने-चांदीच्या किंमती उसळल्या
आज गुरुवारी शेअर बाजारात वोडाफोन आयडियाचा शेअर ११.९२ टक्क्यांनी कोसळला असून तो ९.६७ रुपयांवर आला आहे. वोडाफोनच्या शेअरने २.६१ रुपयांचा तळ गाठला होता. मात्र त्यातून तू पुन्हा सावरला. मागील महिनाभरात शेअरच्या किमतीत १०० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूक विश्लेषक या शेअरवर नजर ठेवून आहेत. दरम्यान एप्रिल आणि मे या दोन महिन्यात ब्रॉडबँड आणि मोबाइल डेटा वापरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच मोबाइल कंपन्यांना चांगला महसूल मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

इंधन दरवाढ सुरुच; पेट्रोलियम कंपन्यांची कमाई जोरात
वोडाफोन-आयडियाने एकूण महसुलासंदर्भातील (AGR) थकबाकी १८००० ते २३००० कोटींच्या दरम्यान असल्याचा दावा केला आहे. मात्र दूरसंपर्क विभागाने वोडाफोन-आयडियावर ५३००० कोटी भरण्याची मागणी केली आहे. समायोजित एकूण महसुलासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Road Accidents in India: हा तर निव्वळ आत्मघात – road accidents after lockdown in india

करोनामुळे देशभरात वाहतूक मंदावली होती आणि त्यामुळे अपघात व अपघाती मृत्यूंची संख्याही कमी झाली होती. मात्र, आता टाळेबंदी संपल्यानंतर पुन्हा रस्तेअपघातांचे प्रमाण करोनापूर्व...

burglary cases in mumbai: मुंबईत वाढल्या घरफोड्या – burglary cases have increased in mumbai after lockdown

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई करोना संकटामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नियंत्रणात असलेल्या मुंबईतील चोऱ्या आणि घरफोड्या पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. लॉकडाउन असल्याने...

Recent Comments