Home संपादकीय wajid khan death: दबंग संगीतकार - musician wajid khan

wajid khan death: दबंग संगीतकार – musician wajid khan


हिंदी चित्रपटसृष्टीत संगीतकारांच्या जोड्या अजरामर झाल्या. आजही अशा जोड्या कार्यरत आहेत. त्यांपैकी साजिद-वाजिद या लोकप्रिय जोडीमधील वाजिद खानचे निधन हिंदी चित्रपटसृष्टीला चटका लावून गेले. संगीतकार बहुतेक पडद्यामागे काम करीत असतात. अलीकडे संगीतविषयक रियालिटी शोमध्ये परीक्षक म्हणून संगीतकार लोकांसमोर येत आहेत आणि त्यांनाही ग्लॅमर प्राप्त होऊ लागले आहे.

वाजिद खान यांना त्यांच्या लोकप्रिय गाण्यांबरोबरच, परीक्षकाच्या भूमिकेमुळेही मोठा चाहतावर्ग मिळाला. प्रसिद्ध तबलावादक उस्ताद शराफत अली खान यांचे पुत्र असलेल्या साजिद-वाजिद यांनी दोन दशकांच्या कारकीर्दीत सत्तरहून अधिक चित्रपटांना संगीत दिले. काही चित्रपटांसाठी गाणी लिहिली आणि काही गाण्यांना आवाजही दिला. सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटापासून १९९८ साली त्यांची संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू झाली. त्यांनी अनेक चित्रपट केले असले, तरी सलमानच्या चित्रपटांचे दबंग संगीतकार, अशीच त्यांची ओळख बनली. ते त्यांचे बलस्थान होते, तसेच ते त्यांच्यातील गुणवत्तेला मारकही ठरणारे होते. त्यांचा प्रारंभीच्या काळातील ‘दिवाना’ हा सोनू निगमचा अल्बम विशेष उल्लेखनीय होता.

‘दबंग’, ‘वाँटेड’, ‘वीर’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘पार्टनर’, ‘सन ऑफ सरदार’, ‘रावडी राठोड’, ‘हाउसफुल २’ या त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांवरून, त्यांच्या एकूण सांगीतिक कर्तृत्वाची कल्पना येऊ शकते. यापुढेही पडद्यावर साजिद-वाजिद हे नाव दिसेल; परंतु हसतमुख वाजिद आपल्यात आता नसल्याची दुखरी जाणीव होत राहील. वाजिद खान यांना श्रद्धांजली!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments