Home देश पैसा पैसा Warren Buffett: वॉरेन बफे यांना विक्रमी तोटा; घेतला मोठा निर्णय - investments...

Warren Buffett: वॉरेन बफे यांना विक्रमी तोटा; घेतला मोठा निर्णय – investments in the airline industry is wrong says warren buffett


नवी दिल्ली: जगातील प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. बफे यांनी आपल्या कंपनीच्या शेअरहोल्डर यांच्यासोबत वार्षिक सभा ऑनलाइन घेतली. या सभेत त्यांनी करोनामुळे जगात अनेक मोठे बदल झाल्याचे सांगितले. त्याआधी त्यांनी कंपनी बर्कशायर हॅथवेला पहिल्या तिमाहीत विक्रमी ५० अब्ज डॉलरचा तोटा झाल्याचे जाहीर केले.

बफे यांनी करोना व्हायरसमुळे कंपनीची वार्षिक बैठक ऑनलाइन घेतली. या बैठकीत त्यांनी सांगितले की विमान सेवा देणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा होता. त्यामुळेच बफे यांनी अमेरिकेतील चार मोठ्या विमान कंपन्यांमधील गुंतवणुकीतून बाहेर पडल्याचे सांगितले. बफे यांच्याकडे अमेरिकेतील डेल्टा एअरलाइन्सचे ११ टक्के, अमेरिकने एअरलाइन्सचे १० टक्के, साऊथवेस्ट एअरलाइन्सचे १० टक्के आणि युनायटेड एअरलाइन्सचे ९ टक्के शेअर्स होते. बफे यांच्या कंपनीने २०१६ पासून या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती.

वाचा- फेसबुकनंतर या दिग्गज कंपनीचीही जिओमध्ये मोठी गुंतवणूक

एअरलाइन्स क्षेत्राची सध्याची परिस्थिती पाहता यात करण्यात आलेली गुंतवणूक मागे घेत आहे. आम्ही अशा कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करणार नाही जेथे भविष्यात आमचे पैसे बुडतील.

बफे यांनी एअरलाइन्स क्षेत्रातील सर्व कंपन्यांमधील सर्व शेअर्सची विक्री केली आहे. करोना व्हायरसमुळे अमेरिकेतील पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून यामुळे हजारो विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. बफे यांनी सांगितले की करोनाच्या आधी हवाई क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याचा विचार केला होता. हवाई क्षेत्राला मोठा झटका बसला आहे. देशात हवाई वाहतूक क्षेत्र पूर्णपणे बंद असल्याचे ते म्हणाले.

डेल्टा एअरलाइन्सने वॉरेन बफे आणि बर्कशायरच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे म्हटले आहे. आम्हाला याची कल्पना होती. कंपनी पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: कंगनाला २२ मार्चपर्यंत अटक करू नका; हायकोर्टाचे निर्देश – kangana ranout and rangoli chandel maintained interim protection from arrest

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेत्री कंगना रणौट व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी...

Iqbal Mirchi: मुंबई : मिर्चीचे कुटुंबीयही ‘परागंदा आर्थिक गुन्हेगार’ – court declares iqbal mirchi’s family members fugitive economic offenders

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दिवंगत निकटवर्तीय व कुख्यात गँगस्टर इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्ची याची पत्नी हाजरा तसेच मुले आसिफ व...

Recent Comments