Home क्रीडा Wasim Jaffer: जो रुटने भारताला ॲडीलेडची आठवण करून दिली; वासीम जाफरच्या उत्तराने...

Wasim Jaffer: जो रुटने भारताला ॲडीलेडची आठवण करून दिली; वासीम जाफरच्या उत्तराने बोलती बंद – india vs england joe root reminds team india about adelaide wasim jaffer s reply will make you laugh


हायलाइट्स:

  • भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्यापासून
  • तिसरी कसोटी मोटेरा मैदानावर डे-नाइट असेल
  • इंग्लंडचा कर्णधार जो रूटने भारतीय संघाला एडिलेटची आठवण करून दिले

नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्या २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा मैदानावर होणारी ही लढत डे-नाइट असणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत.

डे-नाइट कसोटीत भारताकडे इंग्लंडपेक्षा कमी अनुभव आहे. टीम इंडियने बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या पहिल्या डे-नाइट कसोटीत विजय मिळवला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात खेळलेल्या दुसऱ्या लढतीत त्यांचा पराभव झाला होता.

वाचा- कराचीत झाली सत्यनारायणाची पूजा; पाक क्रिकेटपटूने शेअर केला व्हिडिओ

भारतीय संघाने खेळलेल्या अखरेच्या डे-नाइट कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताचा ३६ धावांवर ऑल आउट झाला होता. तिसऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने भारतीय संघाला याची आठवण करुन दिली. अर्थात रूटच्या या वक्तव्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू वासीम जाफरने सडेतोड उत्तर दिले.

इएसपीएन क्रिकइन्फोने जो रूटच्या पत्रकार परिषदेतील त्या गोष्टीचा उल्लेख केला आहे ज्यात त्याने भारतीय संघाचा ३६ धावसंख्येवर ऑल आउट झाल्याचे म्हटले होते. भारतीय संघाच्या मनात ही गोष्ट कुठे ना कुठे सुरूच असेल. त्यावर जाफरने उत्तर दिले आहे.

वाचा- सचिन तेंडुलकर घेणार मोफत क्लास, शिकवणार मास्टर स्ट्रोक कसा लावायचा

जाफर म्हणतो, गेल्या वेळी जेव्हा इंग्लंडने डे-नाइट कसोटी खेळली होती तेव्हा त्यांचे ९ विकेट २७ धावांवर पडल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या त्या सामन्यात इंग्लंडचा ५८ धावांवर ऑला आउट झाला होता. मी फक्त सांगितले.

वाचा- भारतीय खेळाडूची विस्फोटक फलंदाजी; आता तरी संघात स्थान मिळणार का?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन टेस्ट मॅच चेन्नईत झाल्या होत्या. पहिल्या लढतीत इंग्लंडने २२७ ने तर दुसऱ्या लढतीत भारताने ३१७ धावांनी शानदार विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली होती. दोन्ही संघांसाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. न्यूझीलंड याआधीच फायनलमध्ये पोहोचले आहे. या मालिकेच्या निकालावर भारत, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यापैकी एक संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

औरंगाबाद : विनयभंगप्रकरणी तीन आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. ऋषीकेश पालोदकर (२२, रा. पुंडलिकनगर), शुभम...

Mithun Chakraborty Joins BJP: कोलकात्यात PM मोदींची सभा; अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा भाजपमध्ये प्रवेश – actor mithun chakraborty joins bharatiya janata party at pms rally...

कोलकाताः पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर जंगी सभा होत आहे. विशेष म्हणजे या सभेला भाजप नेत्यांसोबत ज्येष्ठ अभिनेते...

मेडिकल कॉलेजवरून मुख्यमंत्र्यांचा राणे यांना टोला, म्हणाले…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'आपण सत्ताधारी आहोत. आपल्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्यासोबत आहे. आपली सत्ता असूनही तुम्ही काहीही...

Ahmednagar: नगर: अपहरणानंतर सहा दिवसांनी ‘त्या’ उद्योजकाचा मृतदेह सापडला – ahmednagar missing businessman found dead near shrirampur midc area

नगर: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथून सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून...

Recent Comments