Home क्रीडा west indies tour of england 2020: आम्ही बळीचा बकरा होण्यासाठी नाही आलो;...

west indies tour of england 2020: आम्ही बळीचा बकरा होण्यासाठी नाही आलो; कर्णधाराने सुनावले! – west indies tour of england 2020 west indies caption jason holder says we are not here to be scapegoat


लंडन: करोना व्हायरस संकटामुळे स्थगित करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने अद्याप सुरू झाले नाहीत. करोना संकट अद्याप दूर झाले नसले तरी काही संघटनांनी खेळाडूंना सराव करण्याची परवानगी दिली आहे. अशातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा एकदा सुरू करण्याचा धाडसी निर्णय इंग्लंड आणि वेस्ट इंडिज बोर्डाने घेतला. या प्रयत्नाचा भाग म्हणून वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी दाखल झाला असून या संघातील सर्व खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

वाचा- घरी एकटाच कमवणार आहे; काही झाले तर कुटुंबाला कोण बघणार?

इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डर म्हणाला, करोना व्हायरसच्या काळात आम्ही पैसे मिळतील या अमिषाने किंवा अती धाडसाच्या भावनेने कसोटी मालिका खेळण्यासाठी आलेलो नाही. तर परिस्थिती सामान्य करण्याच्या दिशेने प्रत्यक्षात टाकलेले हे एक पाऊल आणि प्रयत्न आहे.

वाचा- मास्टर माईंड धोनी… पंड्याला आठवला तो धमाकेदार विजय!

बीबीसी स्पोर्ट्सशी बोलताना होल्डरने सांगितले की, अनेक लोकांना वाटते की क्रिकेट पुन्हा सुरू व्हावे. म्हणून आम्ही येथे बळीचा बकरा होण्यासाठी आलेलो नाही. या काळात आमचा इंग्लंड दौरा सुरूवातीपासून नियोजित होता. जेव्हा या दौऱ्याची चर्चा सुरू झाली तेव्हा खेळाडूंनी होकार दिला आणि म्हणून आम्ही येथे आहोत.

इंग्लंडमध्ये करोना व्हायरसमुळे आतापर्यंत ४० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाजूला वेस्ट इंडिजमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या अतिशय कमी आहे. आम्ही इंग्लंड दौऱ्यावर आलो आहोत त्याचे कारण पैसे हे नाही. तसेच आम्ही आरोग्य सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असे होल्डर म्हणाला.

वाचा- वनडेत होणार होत्या ५०० धावा; फक्त ९ धावा कमी पडल्या!

हा दौरा आमच्यासाठी पैशांचा विषय नाही. आम्हाला सुरक्षा हावी आणि त्यासाठी योग्य व्यवस्था केली जावी. वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना ओल्ड ट्रॅफर्ड येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. तीन आठवड्याच्या सरावानंतर प्रत्यक्षात कसोटी सामन्याला सुरूवात होईल.

वाचा- गांगुलीचे पत्र; यावर्षी IPL होणारच!

मालिकेची सुरुवात ८ जुलैपासून होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना ८-१२ जुलै या कालावधीमध्ये एजेस बाऊल येथे होणार आहे. त्यानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना १६ ते २० जुलै या कालावधीमध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना २४-२८ जुलै या कालावधीत याच ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे.

मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी: ८-१२ जुलै- एजेस बाऊल
दुसरी कसोटी: १६-२० जुलै- ओल्ड ट्रॅफर्ड
तिसरी कसोटी: २४-२८ जुलै- ओल्ड ट्रॅफर्डSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

devendra fadnavis covid positive: देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; राऊत म्हणाले… – sanjay raut wishes devendra fadnavis for speedy recovery

मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. संजय राऊत यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी 'फडणवीस लवकर बरे होवोत यासाठी...

coronavirus in Nashik: coronavirus – दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ६२८ करोनामुक्त – nashik reported 270 new corona cases and 5 death cases in yesterday

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकविजयादशमी अर्थात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात अवघ्या २७० संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर त्याहून सुमारे अडीच पट म्हणजेच...

Recent Comments