Home आपलं जग करियर western railway bharti 2020: दहावी पाससाठी पश्चिम रेल्वेत मोठी भरती; मुंबईत पोस्टिंग...

western railway bharti 2020: दहावी पाससाठी पश्चिम रेल्वेत मोठी भरती; मुंबईत पोस्टिंग – western railway bharti 2020 jobs in western railway


मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही पदे आरोग्य अधिकाऱ्यांसह अन्य प्रकारची देखील आहेत. दहावी उत्तीर्णांपासून एमबीबीएसपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आवश्यक आहे. २६ मे रोजी मुलाखती होणार आहेत. विशेष म्हणजे ६५ वर्षे वयापर्यंतचे रेल्वेचे आणि अन्य शासकीय निवृत्त कर्मचारी देखील अर्ज करू शकणार आहेत. जाणून घ्या अधिक माहिती –

पदाचे नाव – पदांची संख्या – वयोमर्यादा

सीएमपी-जीडीएमओ – ०९ पदे (वयोमर्यादा – ५३ वर्षे)

सीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट/अॅनेस्थेटिस्ट/फिजिशीअन/रेडिओलॉजिस्ट/इंटेन्सिविस्ट – ११ पदे- (वयोमर्यादा – ५३ वर्षे)

रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसीस टेक्निशिअन – ०२ पदे – (वयोमर्यादा – २०-३३ वर्षे)

हॉस्पिटल अटेंडंट्स – ६५ पदे – (वयोमर्यादा १८-३३ वर्षे)

हाऊस किपिंग असिस्टंट – ९० पदे – (वयोमर्यादा १८-३३ वर्षे)

एकूण पदे – १७५

शैक्षणिक पात्रता

सीएमपी-जीडीएमओ – MBBS (MCI मान्यता) MCI/MMC नोंदणी आवश्यक

सीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट/अॅनेस्थेटिस्ट/फिजिशीअन/रेडिओलॉजिस्ट/इंटेन्सिविस्ट – MBBS आणि त्या-त्या स्पेशालिटीतील PG डीग्री / डिप्लोमा (MCI मान्यता) MCI/MMC नोंदणी आवश्यक

रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसीस टेक्निशिअन – B.sc अधिक हेमोडायलिसीसमधील डिप्लोमा किंवा हेमोडायलिसीस कामाचा दोन वर्षांचा अनुभव (अनुभवाचा दाखला जोडावा)

हॉस्पिटल अटेंडंट्स – दहावी पास, रुग्णालयातील अनुभव आवश्यक

हाऊस किपिंग असिस्टंट – दहावी पास, रुग्णालयातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य

वेतन

सीएमपी-जीडीएमओ – दरमहा ७५,००० रु.

सीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट/अॅनेस्थेटिस्ट/फिजिशीअन/रेडिओलॉजिस्ट/इंटेन्सिविस्ट – दरमहा ९५,००० रु.

रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसीस टेक्निशिअन – दरमहा ३५,००० रु. अधिक भत्ते

हॉस्पिटल अटेंडंट्स – दरमहा १८,००० रु. अधिक भत्ते

हाऊस किपिंग असिस्टंट – दरमहा १८,००० रु. अधिक भत्ते

अर्ज कसा करायचा?

अर्ज ऑनलाइन भरायचा आहे किंवा ekarmikbct या गुगल प्ले वरील डाऊनलोडेबल अॅप्लिकेशनद्वारे अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची मुदत

इच्छुक उमेदवारांनी २४ मे २०२० पर्यंत अर्ज करायचे आहेत. २६ मे २०२० रोजी मुलाखती होणार आहेत.

रेल्वेचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक कराSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments