Home शहरं मुंबई What is Honey Trap?: Explainer: हनी ट्रॅप म्हणजे काय? - what does...

What is Honey Trap?: Explainer: हनी ट्रॅप म्हणजे काय? – what does it mean by honey trap?


मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. मात्र, आरोप करणाऱ्या महिलेवर विविध पक्षातील नेत्यांनी आरोप केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. ‘हनी ट्रॅप’चा नवा अँगल या प्रकरणात समोर आला आहे. ‘हनी ट्रॅप’ हा काय प्रकार असतो? याचा घेतलेला हा वेध… (What is Honey Trap??)

हनी ट्रॅप म्हणजे…

मोहात पाडू शकणाऱ्या किंवा आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे व विविध कारणांसाठी त्याचा वापर करून घेण्याच्या पद्धतीला ‘हनी ट्रॅप’ म्हणतात. ब्रिटीश इंग्रजीमध्ये हा शब्द चांगलाच प्रचलित आहे. हेरगिरीच्या जगात ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली. आता पत्रकारितेत हा शब्द सर्वाधिक वापरला जातो. या प्रकारावर हॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटही होऊन गेले आहेत.

इतिहास काय सांगतो?

‘हनी ट्रॅप’ हा प्रकार नवा नाही. याचे काही दाखले आपल्याला पुराणातही मिळतात. महायुद्धांच्या काळातही शत्रू राष्ट्राची माहिती काढून घेण्यासाठी परस्परांविरोधात ‘हनी ट्रॅप’ लावले गेल्याची अनेक उदाहरणं आहेत. प्रत्येक क्षेत्रात अशी उदाहरणं बघायला मिळतात. राजकारण, कॉर्पोरेट, क्रीडा सर्वच क्षेत्रांमध्ये कधी ना कधी याचा वापर होत आला आहे.

स्वरूप बदलले?

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘हनी ट्रॅप’च स्वरूप बदललं आहे. पूर्वी ‘हनी ट्रप’ लावणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटत असे. आता मात्र फेसबुक, व्हॉट्सअॅप, हाइक, वी चॅट अशा वेगवेगळ्या माध्यमांतून सावज हेरले जाते व अनेकदा प्रत्यक्ष न भेटता ऑनलाइन फसवणूक केली जाते किंवा त्याला जाळ्यात अडकवले जाते. उदा. न्यूड फोटो पाठवून ते आपले असल्याची खात्री समोरच्याला पटवली जाते. त्याची खात्री पटली की त्यालाही तसे फोटो पाठवण्यास सांगितलं जातं. एखाद्यानं हे फोटो पाठवले की मग तो अलगद या ‘ट्रॅप’मध्ये सापडतो. तिथून मग पैशांची मागणी अथवा मानसिक छळाला सुरुवात होते.

असा लावला जातो ‘ट्रॅप’

हल्ली एखादा क्रमांक शोधून त्यावर स्वतःची जुजबी माहिती देणारा पहिला मेसेज टाकला जातो. कुतूहल म्हणून एखाद्यानं त्यास प्रतिसाद दिला, की मग गोड बोलून जवळीक साधण्यास सुरुवात होते. मग तुम्ही केलेल्या सेक्स चॅटचा वापर करून खंडणी मागितली जाते. माजी आमदार व भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, रेणू शर्मा हिनं त्यांना अशाच पद्धतीनं जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. ती हेगडे यांना सतत व्हॉट्सअॅप मेसेज करून किंवा कॉल करून रिलेशनशीप ठेवण्याची मागणी करत होती.

सावधगिरी कशी बाळगाल?

आताच्या जमान्यात कोण कसा ‘ट्रॅप’ लावेल सांगता येत नाही. त्यामुळंच अनोळखी व्यक्तींशी एका मर्यादेच्या पलीकडं चॅट करण्याच्या मोहात पडू नका. वैयक्तिक माहिती पाठवू नका. कुणी सतत मेसेज करत असेल तर त्याला ब्लॉक करा. तरीही फसवणूक झालीच तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bhagat Singh Koshyari Says Fear Of Second Corona Wave In Maharashtra – bhagat singh koshyari :’राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता’ | Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनासाठी विविध उपाययोजना आखतानाच राज्य सरकारने धारावीसारख्या भागात यशस्वीपणे कामगिरी केली आहे. मात्र करोनाची लढाई अजून सुरूच आहे. 'मी...

Sitaram Kunte: अनुभवी आणि विश्वासार्ह : सीताराम कुंटे – sitaram kunte new chief secretary of maharashtra

अखेर सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव झाले. खरेतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच ते मुख्य सचिवपदी येणार असा अनेकांचा कयास होता.  Source...

Corona Rules Violation: करोनाबाधित नियमांचा भंग करून फिरत होता घराबाहेर; गुन्हा दाखल – police file fir against corona positive man for corona rules violation

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनास रोखण्यासाठी मुंबईत लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गोवंडी पोलिस ठाण्यापाठोपाठ सोमवारी चेंबूर पोलिस ठाण्यात...

Recent Comments