Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल WhatsApp: WhatsApp आता आणखी मजेदार, आले अॅनिमेटेड स्टिकर्स - whatsapp rolls out...

WhatsApp: WhatsApp आता आणखी मजेदार, आले अॅनिमेटेड स्टिकर्स – whatsapp rolls out animated stickers to its android, ios beta apps


नवी दिल्लीः व्हॉट्सअॅप गेल्या काही महिन्यांपासून आपल्या प्लॅटफॉर्मवर अॅनिमेटेड स्टिकर्स आणण्याचे काम करीत आहे. गेल्या आठवड्यात फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp ने आपल्या बीटा युजर्ससाठी अॅनिमेटेड स्टिकर्सला व्ह्यू करण्यासाठी अपडेट रोल आउट केले होते. आता कंपनीने नवीन अपडेट सोबत बीटा अॅप्स मध्ये अॅनिमेटेड स्टिकर पॅक्स डाऊनलोड करण्याचे फीचर दिले आहे.

वाचाः सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G फोन येतोय, जाणून घ्या डिटेल्स

WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, WhatsApp चे हे येणारे अॅनिमेटेड स्टिकर्स तीन भागात आहेत. सर्वात आधी युजर्सला अॅनिमेटेड स्टिकर्स व्ह्यू करण्याचा ऑप्शन मिळेल. म्हणजेच युजर्स रिसीव होणाऱ्या अॅनिमेटेड स्टिकर्सला सेव्ह आणि सेंड करु शकतील. दुसऱ्या भागात अॅपला थर्ड पार्टीकडून स्टिकर पॅक्स आयात करु शकतील. तर तिसऱ्या भागात व्हॉट्सअॅप स्टोरमधून डिफॉल्ट स्टिकर पॅक्स डाऊनलोड करण्याचे ऑप्शन मिळेल.

व्हॉट्सअॅपच्या ब्लॉग वेबसाईटच्या माहितीनुसार, WhatsApp ने या फीचरसाठी तिसऱ्या भागात रोलआऊट करणे सुरू केले आहे. ज्यात युजर्स व्हॉट्सअॅप स्टोरवरून अॅनिमेटेड स्टिकर्स डाऊनलोड करु शकतील. कंपनीने अँड्रॉयड आणि आयओएस बीटा अॅप युजर्संसाठी Playful Piyomaru नावाचे पहिले अॅनिमिटेड स्टिकर पॅक रिलीज केले आहे. कंपनीने अँड्रॉयड बीटा अॅप युजर्स अँड्रॉयड बीटा अॅप व्हर्जन 2.20.195.1 ला रोलआऊट करुन नवीन फीचरचा वापर करु शकतील. तर आयफोन बीटा अॅप युजर्सला हे फीचर वापरण्यासाठी बीटा व्हर्जन 2.20.70.26 डाउनलोड करावे लागेल.

वाचाः TikTok प्ले स्टोरवरून आउट, हळूहळू गायब होताहेत अॅप

नवीन रिलीज झालेल्या स्टिकर पॅकमध्ये अॅनिमेशन देण्यात आले आहे. परंतु, हे स्टिकर्स लूपमध्ये अॅनिमेशन प्ले होत नाही. स्पष्टपणे सांगायचे म्हणजे नवीन रिलीज झालेले स्टिकर पॅकमध्ये लूप स्टिकर्स नाही. अॅनिमेटेड स्टिकर्सला लूप मध्ये अॅनिमेशन प्ले करण्याचे फीचर आणणार का नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.

वाचाः फोनमध्ये सुरू असलेले चायनीज अॅप्स होणार बंद

वाचाः फोनमधून हटवा चीनी अॅप, असे निवडा भारतीय अॅप

वाचाः चीनी अॅप्स का बंद केले?, आता युजर्स काय करणार?

वाचाः सरकारचा मोठा निर्णय, TikTok सह ५९ चायनीज अॅपवर बंदीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Corona Update: नव्या ३८ बाधितांची भर; ५६ जणांनी सुट्टी – aurangabad corona update : aurangabad reported 38 new corona cases in yasterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यात शनिवारी ३८ करोनाबाधितांची भर पडली. त्यात शहरी भागातील ३१ तर ग्रामीण भागातील सात रुग्णांचा समावेश आहे.सध्या जिल्ह्यात १६७ करोनाबाधित...

public health service in nashik: सार्वजनिक सुटीतही ओपीडी सुरूच ठेवा – opd service in civil hospital and other government hospital should be continue even...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकसिव्हिल हॉस्पिटलसह अन्य सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये दुपारी १ ते ४ यावेळेत विशेष बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित करावा. तसेच योगा क्लासेससारखे...

Recent Comments