Home क्रीडा who scored first double hundred in odi: प्रेक्षकांच्या भीतीने सचिनला आऊट दिले...

who scored first double hundred in odi: प्रेक्षकांच्या भीतीने सचिनला आऊट दिले नाही! – south africa fast bowler dale steyn says umpire ian gould did not gave sachin tendulkar out in 190s fearing from in dian crowd


नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या त्या खेळीबद्दल एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. सचिनने ग्वालियर येथे झालेल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २०० धावा केल्या होत्या. या सामन्यात सचिन बाद असताना अंपायरने त्याला बाद दिले नव्हते, अशी माहिती जलद गोलंदाज डेल स्टेनने दिली.

वाचा- ‘आफ्रिदी, पाकिस्तान विकला तरी पैसे कमी पडतील!’

सचिनने आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक अशी खेळी करत नाबाद २०० धावा केल्या होत्या. अशी खेळी करणारा तो पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला होता. या सामन्यात सचिन १९० धावांवर खेळत असताना बाद झाला होता. पण अंपायर इयान गूल्ड यांनी त्याला बाद दिले नाही, असे स्टेन म्हणाला.

सचिन द्विशतकापासून १० धावा दूर होता आणि माझ्या चेंडूवर तो LBW झाला. पण अंपायरनी त्याला बाद दिले नाही. यासंदर्भात मी त्यांना मैदानातच विचारणा केली असता ते म्हणाले, मित्रा आजूबाजूला बघ त्याला (सचिन) बाद दिले. तर मी हॉटेलमध्ये जाऊ शकणार नाही.

वाचा- क्रिकेटपटू म्हणाला, बुलाती है मगर जाने का नही!

स्काय स्पोर्ट्सच्या पॉडकास्टमध्ये इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अॅडरसन सोबत चॅटवर त्याने ही गोष्ट सांगितली. सचिनने आमच्या विरुद्ध पहिले द्विशतक झळकावले. पण मी त्याला १९० धावांवर बाद केले होते. पण इयान गूल्ड यांनी त्याला नॉट आऊट दिले.

वाचा- शिखर धवन म्हणाला, काश्मीर हमारा था और हमारा ही रहेगा!

या सामन्यात सचिने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावण्याचा मान मिळवला होता. सचिनने १४७ चेंडूत २५ चौकार, ३ षटकारांसह नाबाद २०० धावा केल्या. तर भारताने ३ बाद ४०१ धावांचा डोंगर उभा केला. उत्तरा दाखल आफ्रिकेला २४८ धावा करता आल्या आणि भारताने तो सामना १५३ धावांनी जिंकला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता पहिले द्विशतक झळकावण्याचा विक्रम सचिनच्या नावावर नाही तर ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू बेलिंदा क्लार्कच्या नावावर आहे. क्लार्कने सचिनच्या द्विशतका आधी म्हणजे १६ डिसेंबर १९९७ रोजी वनडे क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००च्या पुढे धावा करण्याचा मान बेलिंदा यांच्याकडे जातो. महिला आणि पुरुष क्रिकेटमधील हे पहिले द्विशतक होते.

भारतात झालेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीत डेन्मार्क विरुद्ध क्लार्कने नाबाद २२९ धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाने त्या सामन्यात ३६३ धावांनी विक्रमी विजय मिळवला होता. महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बेलिंदाच्या नावावर आहे. तिने ११८ वनडे सामन्यात ४ हजार ८४४ धावा केल्या आहेत. वनडे आणि कसोटीमध्ये तिची सरासरी ४५च्या पुढे आहे. इतक नव्हे तर क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने दोन वेळा वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shaheen afridi: ‘या’ गोलंदाजाने भारताच्या जसप्रीत बुमराहचा विक्रम मागे टाकला – pakistan shaheen afridi became quickest 100 wickets in t20

नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह(jasprit bumrah)चा टी-२० मधील विक्रम पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने मागे टाकलाय. २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहीन...

Recent Comments