Home विदेश WHO team arrives in Wuhan: Coronavirus China चीनचं पितळ उघडं पडणार? WHO...

WHO team arrives in Wuhan: Coronavirus China चीनचं पितळ उघडं पडणार? WHO चे पथक वुहानमध्ये दाखल – who team reaches wuhan to find out the epicenter of covid 19 epidemic


बीजिंग: संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूच्या संसर्गाच्या उगमाचे स्रोत शोधण्यासाठी आणि त्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक गुरुवारी चीनमधील वुहान शहरात दाखल झाले. वुहान शहरातूनच करोनाचा संसर्ग चीनमध्ये आणि संपूर्ण जगभरात फैलावला. डिसेंबर २०१९ मध्ये वुहानमध्ये पहिला करोनाबाधित आढळला.

१४ दिवस आयसोलेशनमध्ये राहणार?

जागतिक आरोग्य संघटनेचे संपूर्ण पथक सिंगापूरहून चीनमध्ये दाखल झाले आहे. यामध्ये १० तज्ज्ञांचा समावेश आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेचे पथक प्रत्यक्षपणे आपल्या कामाला सुरुवात करण्याआधी चीनमधील करोना नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार आयसोलेशनची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. त्यामुळे १४ सदस्यीय पथकाला १४ दिवस आयसोलेशनमध्ये राहवे लागणार असून त्यांची कोव्हिड चाचणीही होण्याची शक्यता आहे.

वाचा: ‘त्या’ जंगलात आहे तरी काय? करोनाचे उगमस्थान शोधणाऱ्यांवर चीनची करडी नजर

वाचा: काळजी घ्या! करोनानंतरचा न्यूमोनिया घातक; संशोधकांचा इशारा

इतर देशांचाही दौरा करण्याची मागणी

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी माध्यमांना सांगितले की, विषाणूचा उगम कोठे झाला, हा एक वैज्ञानिक प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तज्ज्ञांनी इतर देशांचाही दौरा करण्याची आवश्यकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे पथक आयसोलेशनमध्ये असताना चीनचे तज्ज्ञ त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Coronavirus करोनावर लपवाछपवी; चीनने नकारात्मक बातम्या ‘अशा’ दडपल्या!
दरम्यान, चीनने करोनाबाबतची माहिती लपवली असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. चीनने या विषाणूबाबत फारसं गांभीर्य दाखवले नाही आणि त्याशिवाय संपूर्ण जगाला अंधारात ठेवल्यामुळे करोनाचा फैलाव झाला असल्याचा आरोप चीनवर करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या चौकशी पथकालाही चीनमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या आरोपाला आणखीच बळ मिळाले होते. व्हिसाच्या तांत्रिक बाबींमुळे प्रवेश देण्यास अडचणी निर्माण झाल्याचे चीननेनंतर स्पष्ट केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Crime: अमोल कोल्हेंच्या नावाने बिल्डरकडे मागितले पैसे; पुढे काय घडले पाहा – money demanded from builder in the name of amol kolhe

पुणे:लॉकडाऊन काळात एका बिल्डरला खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करून फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात वानवडी...

Prakash Javadekar: जावडेकरांचा राहुल गांधींवर पलटवार; म्हणाले, ‘काँग्रेसने शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक चिथावले’ – rahul gandhi wasn’t only supporting protest but also instigating says union min...

नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकर्‍यांच्या हिंसाचाराचा ( tractor rally violence ) ठपका कॉंग्रेसने सरकार आणि पोलिसांवर ठेवला असतानाच कॉंग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या ट्विटला भाजपने शेतकरी...

Recent Comments