Home शहरं नागपूर Woman attempt Suicide for TV: Nagpur Crime News: नवरा टीव्ही घेत नसल्यानं...

Woman attempt Suicide for TV: Nagpur Crime News: नवरा टीव्ही घेत नसल्यानं मुलांना विष पाजून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न – upset over not having a tv, woman poisons self, two children in nagpur


नागपूर: नवरा टीव्ही घेत नाही या रागातून एका महिलेने तिच्या दोन मुलांना विष पाजून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.. काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना वाठोड्यातील न्यू गणेशनगर भागात शुक्रवारी उघडकीस आली. मिर्झा आयशा नसीम बेग (वय ३२) असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे. तर, मिर्झा अमन नसीम बेग (वय ६) व मिर्झा हबीबा नसीम बेग (वय १० महिने) अशी तिच्या मुलांची नावं आहेत. तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून दोन महिन्यांच्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वाचा: भयंकर! विलगीकरण कक्षात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

आयशा हिचे पती नसीम बेग यांचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. मागील तीन महिन्यांपासून आयशा ही घरात टीव्ही घेण्यासाठी नसीम यांच्याकडे तगादा लावत होती. पण तेवढी ऐपत नसल्याने नसीम यांना टीव्ही घेणे जमत नव्हते. पैसे जमल्यानंतर टीव्ही घेऊ असे सांगून नसीम हे वेळ मारून न्यायचे.

काही दिवसांपूर्वी आयशा हिनं पुन्हा एकदा नसीम यांना टीव्हीबाबत विचारणा केली. नसीम यांनी लवकरच टीव्ही खरेदी करू असं आयशाला सांगितलं. मात्र, आता तिचा संयम सुटला होता. नसीम हे टीव्ही घेणार नाहीत, असा समज तिनं करून घेतला आणि नवऱ्यासोबत वाद घातला. नवऱ्यासोबत झालेल्या याच भांडणाचा राग मनात धरून आयशानं अमन व हबीबा या आपल्या दोन मुलांना विष पाजलं. मुलांना विष पाजल्यानंतर ती स्वत:ही प्यायली. विष शरीरात भिनल्यानं तिघांची प्रकृती खालावली. नसीम यांनी तातडीनं या तिघांनाही रुग्णालयात दाखल केलं. या तिघांवर सरकारी वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून चिमुकल्या हबीबाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी आयशा हिच्यावरुद्ध हत्येचा प्रयत्न व आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाचा: बेसुमार बिल आकारणाऱ्या सोमय्या रुग्णालयाला कोर्टाचा दणकाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Corona Cases in Aurangabad: एका रुग्णाचा मृत्यू; १११ नवे बाधित – aurangabad reported 111 new corona cases and 1 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील पाथरी येथील ७० वर्षांच्या बाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या...

Maradona Goals Every Football Fans Should Watch His Skills And Abilities – Maradona Goals Video: प्रत्येक चाहत्याने पाहिले पाहिजेत मॅराडोनाच्या सर्वोत्तम गोलचे व्हिडिओ

नवी दिल्ली: फुटबॉल जगातील महान खेळाडू दिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांचे बुधवारी निधन झाले. फुटबॉल जगतातील सर्व चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या मॅराडोनाच्या निधनामुळे...

suvrat joshi startup: अभिनेता सुव्रत जोशीच्या मदतीनं सुरु होतंय नवीन ‘पर्व’ – marathi actor suvrat joshi is part of new startup called parva

मुंबई: अभिनेता सुव्रत जोशी काही दिवसांपूर्वीच लंडनहून परताय. त्यानं त्याच्या आगामी चित्रपटासाठी डबिंगचं कामही सुरू केलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का सुव्रत...

ITI admissions 2020: ‘आयटीआय’चे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘एसईबीसी’आरक्षण वगळून प्रवेश – iti admissions 2020 revised schedule announced

म. टा. प्रतिनिधी, पुणेऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) प्रवेशप्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 'एसईबीसी' आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या आदेशानंतर बुधवारी व्यवसाय शिक्षण व...

Recent Comments