Home देश woman delivers baby at dental clinic : ती ७ किमी चालली, डेंटल...

woman delivers baby at dental clinic : ती ७ किमी चालली, डेंटल क्लिनिकमध्ये दिला बाळाला जन्म – bengaluru pregnant woman walks for 7km in search of hospital and she delivers baby at dental clinic


बेंगळुरू: लॉकडाउन असल्याने प्रसूतीसाठी तब्बल ७ किलोमीटर पायी चालत शोध घेतल्यानेही हॉस्पिटल न सापडल्याने अखेर एका गरोदर महिलेला एका दाताच्या दवाखान्यात मुलाला जन्म द्यावा लागला. ही घटना १४ एप्रिल या दिवशी घडली.

दंतचिकित्सक डॉ. राम्या एन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरोदर महिला तिच्या पतीसोबत १४ एप्रिल या दिवशी सकाळी ९ वाजता विद्यारनयपुराच्या मेन रोडवर असलेल्या दाताच्या दवाखान्यात पोहोचली. त्यावेळी डॉ. राम्या एन या दवाखान्यात नव्हत्या. त्यांच्या मदतनीस दवाखान्यात हजर होत्या. या महिलेने रुग्णालय शोधण्यासाठी ७ किमीची पायपीट केली. ७ किमीचा प्रवास करून ही महिला थकली होती. दवाखान्यात पोहोचल्यानंतर १० मिनिटांतच तिने अकाली (प्रीमॅच्युअर) बाळाला जन्म दिला.

डॉ. राम्या एन. यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर महिला बेशुद्ध झाली आणि आपले बाळ दगावल्याचे समजून त्याच्या वडिलांनी बाळाला गुंडाळून ठेवले. २० मिनिटे बाळ त्याच अवस्थेत होते. त्यानंतर डॉ. राम्या एन. आणि त्याचे डॉक्टर पती डॉ. हिमानिश दवाखान्यात आले. तपासणीनंतर बाळ जिवंत असल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर त्यांनी आई आणि बाळावर उपचार सुरू केले. त्यांची तब्येत सुधारल्यानंतर त्यांना के. सी. जनरल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्या हॉस्पिटलमध्ये आई आणि मुलाची प्रकृती उत्तम असल्याचे आम्हाला कळवण्यात आल्याचे डॉ. राम्या यांनी सांगितले.

महिला आणि तिच्या पतीने त्यांची ओळख उघड केली नाही, मात्र ते बिहार किंवा ओडिशातील स्थलांतरीत मजूर असावेत असे डॉ. राम्या म्हणाल्या. ही महिला बेंगळुरूत राहते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

motorola moto g10: Moto G10 आणि Moto G30 ची लवकरच होणार भारतात एन्ट्री, कंपनीने शेयर केला टीजर – moto g10 and moto g30 india...

हायलाइट्स:मोटोरोला कंपनी दोन बजेट स्मार्टफोन भारतात लाँच करणार Moto G10 आणि Moto G30 असे स्मार्टफोनचे नाव याआधी मोटोरोला कंपनीने या फोनला युरोपमध्ये...

Aurangabad Corona Update: Coronavirus : दोन मृत्यू, ३५७ नवे बाधित – aurangabad reported 357 new corona cases and 2 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहरातील शिवाजीनगर येथील ८३ वर्षीय, तर जालना जिल्ह्यातील तळणी येथील ६० वर्षीय, अशा दोन बाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू...

raj thackeray without mask: Nashik: मास्क न घालताच राज ठाकरे नाशिकमध्ये; माजी महापौरांना म्हणाले… – mns chief raj thackeray in nashik without wearing mask

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मास्क न घालताच ते आज सकाळी नाशिकमध्ये पोहोचले. मास्कवर मास्क घालून स्वागतासाठी...

Recent Comments