Home शहरं औरंगाबाद woman murder: संशयाचं भूत; मुलांसमोरच पतीनं चाकूनं पत्नीचा गळा चिरला - woman...

woman murder: संशयाचं भूत; मुलांसमोरच पतीनं चाकूनं पत्नीचा गळा चिरला – woman killed by husband in aurangabad


म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने चाकू व कुऱ्हाडीने गळा चिरून तिचा निर्घृण खून केल्याचा प्रकार मंगळवारी (दोन जून) सकाळी आठ वाजता म्हैसमाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरातील शासकीय निवासस्थानी उघडकीस आला. संशयित आरोपी लहू भागाजी साळवे (रा. साताळा ता. फुलंब्री) हा पसार झाला असून मृत महिलेचे नाव माया लहू साळवे (वय २५), असे आहे. मृत महिलेचे वडील सुभाष लहानू तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लहू साळवे याच्याविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित लहू साळवे चार महिन्यांपासून तो पत्नी माया, दोन मुले अनिकेत (वय सहा) व शंकर (वय चार) यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरातील सासरे सुभाष लहानू तुपे यांच्या शासकीय निवासस्थानी राहत होता. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास सासरे सुभाष तुपे हे कावीळचे औषध आणण्यासाठी लामनगाव येथे गेले होते. सकाळी साडेसहा ते आठच्या दरम्यान पती-पत्नीत वाद सुरू झाला. चारित्र्यावर संशय घेत पतीने मायाला मारहाण केली, त्यानंतर लहू साळवे याने धारदार हत्याराने मायाचा गळा चिरला. घरात लहान मुले होती. लामनगाव येथून परत आल्यानंतर अनिकेत व शंकर यांनी घडलेली घटना आजोबांना सांगितली. रक्तबंबाळ अवस्थेत मायाला खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव व पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, सपोनि पंकज उदावंत यांनी घटनास्थळी पाहणी केली.

हुंड्यासाठी छळ; विवाहितेनं गळफास घेऊन केली आत्महत्या

पुणे खुनाच्या घटनांनी हादरलं; शहर प्रचंड दहशतीखालीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aditya Roy Kapur: एका कॉलवर आदित्य रॉय कपूरच्या मदतीला धावून आले रामदास आणि सत्यजित पाध्ये – Aditya Roy Kapur Becomes Bollywoods First Actor Get...

मुंबई- अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेला 'लुडो' हा चित्रपट एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आदित्य रॉय-कपूरनं या चित्रपटात एका शब्दभ्रमकाराची भूमिका...

सटाण्यातील व्यावसायिक माखिजा यांची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा सटाणा शहरातील बागलाण ब्रॅण्डी हाऊसचे संचालक (वय ६२) यांनी रविवारी सायंकाळी लोहणेर येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी मारून ...

व्यापारी सासूरवाडीला गेला होता, फ्लॅटवर परतल्यानंतर दृश्य बघून हादरलाच

म. टा. प्रतिनिधी, : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर)...

Recent Comments