Home देश पैसा पैसा World Cycle Day: फक्त सायकलमुळे १.८ ट्रिलियनची होऊ शकते बचत! - instead...

World Cycle Day: फक्त सायकलमुळे १.८ ट्रिलियनची होऊ शकते बचत! – instead of a motorcycle ues bicycle for a short distance you will save rs 1.8 trillion every year


नवी दिल्ली: भारतातील करोना व्हायरसची संख्या एक लाखांच्या पुढे गेली असली तरी देशातील लॉकडाऊन मागे घेत हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. करोनाची लागण होऊ नये म्हणून अनेक जण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्या ऐवजी अन्य साधनांचा वापर करत आहेत. करोनामुळे झालेल्या बदलात आता जगभरात रस्त्यांची निर्मिती सायकल चालवणाऱ्यांसाठी अनुकुल अशी करण्याचा विचार सुरू आहे. भारता सारख्या देशात सायकल किती प्रभावी ठरू शकेल याचा विचार सुरू असून याचा अर्थव्यवस्थेला किती फायदा होऊ शकेल हे जाणून घेऊयात…

वाचा- ७४ कर्मचारी झाले करोडपती; CEOचे पॅकेज ३९ टक्क्यांनी वाढले!

एका अभ्यासानुसार जर छोट्या अंतरासाठी मोटरसायकल आणि चार चाकी गाड्यांच्या ऐवजी सायकलचा वापर केल्यास प्रत्येक वर्षी १.८ ट्रिलियन रुपयांची बचत होऊ शकते. याचा थेट फायदा अर्थव्यवस्थेला होईल. जागतिक आरोग्य संघटनेने सोशल डिस्टसिंग आणि व्यायामला महत्त्व देण्याच्या दृष्टीने सायकलचा वापर करावा असा सल्ला दिलाय. करोना संकटामुळे विविध देशातील अनेक शहरात सायकल वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यात मिलान, जिनिव्हा, ब्रुसेल्स आणि लंडन सारख्या शहरांचा समावेश असून लोकांनी यात सहभाग दाखवला आहे.

वाचा- EMI पुढे ढकलताय, फायद्या ऐवजी होऊ शकते नुकसान; जाणून घ्या ३ पर्याय!

भारतात देखील केंद्र आणि राज्य सरकारांनी सायकलचा वापर करण्यावर भर दिला आहे. तसेच रस्ते सायकल चालवण्याच्या दृष्टीने अनुकुलू करण्याचे आदेश दिलेत. लोकांनी देखील सायकल चालवण्याला अनुकुलता दाखवली आहे. अनेकांनी रस्त्यावर सायकलसाठीच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाय योजना करावी, असे म्हटले आहे.

वाचा- करोनाची जखम; हे आहे अर्थव्यवस्थेसाठीचे औषध!

हिरो मोटर्सचे अध्यक्ष पंकज मुंजाल म्हणाले, अर्थव्यवस्था पुन्हा सुरू झाली. पण करोना रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर टाळत आहे. अशा परिस्थितीत रस्ते सायकल चालवण्याच्या दृष्टीने तयार करणे गरजेचे आहे. भारताने जगात होत असलेले बदल समजून घेतले पाहिजेत आणि याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे.

वाचा- या महिलेला मिळाले २४ हजार कोटी!

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विषयक समितीने म्हटले आहे की, चालत अथवा सायकलचा वापर केला तर अनेक लोकांचे जीव वाचतील. तसेच पर्यावरण देखील सुरक्षित राहिल. द एनर्जी अॅण्ड रिसोर्स इन्सिट्यूटने जानेवारी २०१९ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार जर छोट्या अंतरासाठी सायकलचा वापर केल्यास १.८ ट्रिलियन रुपयांची बचत होऊ शकते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rohit Sharma: AUS vs IND: रोहित शर्माच्या जागेवर हक्क सांगणारे तिन्ही फलंदाज पहिल्याच सामन्यात झाले फेल – aus vs ind: lokesh rahul, mayank agarwal...

सिडनी, AUS vs IND: रोहित शर्माने आतापर्यंत भारताला बऱ्याच सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. रोहितच्या दमदार सुरुवातीच्या जोरावर भारताने बरेच सामने जिंकले...

Kangana Ranaut Share Photo With Sanjay Dutt Netizen Trolled Her – संजय दत्तला भेटायला गेली कंगना रणौत, यूझर्स म्हणाले- शेवटी नेपोकिड, चरसीसोबत बसलीस

मुंबई- सध्या कंगना रणौत तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे घरापासून दूर आहे. सध्या ती एकाचवेळी 'थलायवी' आणि 'धाकड' या दोन सिनेमांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. दरम्यान,...

farmers protest on burari nirankari ground: अखेर शेतकऱ्यांना दिल्लीत एन्ट्री, बुराडी मैदानात आंदोलनाची परवानगी – farmer protest delhi burari nirankari ground police permission farm...

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना अखेर दिल्लीत एन्ट्री मिळालीय. शुक्रवारी पोलीस आणि आंदोलकांत उडालेल्या धुमश्चक्रीनंतर प्रशासनाकडून शेतकऱ्यांना...

mumbai news News : NCP: राष्ट्रवादीने आघाडीधर्म पाळला; शिवसेनेच्या विरोधातील ‘त्या’ बंडखोराची हकालपट्टी – candidate who rebelled against shiv sena expelled from ncp

मुंबई: अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणाऱ्या चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर...

Recent Comments