Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल Xiaomi CEO: शाओमीच्या CEO ने शेअर केले आपले ३ आवडते स्मार्टफोन -...

Xiaomi CEO: शाओमीच्या CEO ने शेअर केले आपले ३ आवडते स्मार्टफोन – xiaomi smartphones: xiaomi ceo shares his 3 favorite smartphones


नवी दिल्लीः शाओमी नवीन-नवीन स्मार्टफोन आणि प्रोडक्ट आणून नेहमी चर्चेत असते. आता शाओमी ग्रुपचे अध्यक्ष आणि सीईओ ली जुन यांनी आपले ३ आवडते स्मार्टफोन शेअर केले आहेत. ली जुन यांचा सर्वात जास्त आवडता फोन Mi Mix 2 असल्याचे म्हटले आहे. या फोनमध्ये सेरामिक बॉडी देण्यात आली आहे. जुन यांच्या माहितीनुसार, ही यूनीबॉडी सेरामिक डिझाईन सोबत येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. याला बनवण्यासाठी खूप कष्ट लागतात तसेच याला खर्चही खूप येतो, असे जुन यांनी म्हटले आहे.

वाचाः Paytm चा इशारा, या एका चुकीमुळे रिकामे होईल अकाउंट

Mi Mix 2 सर्वात जास्त आवडता फोन
Mi Mix 2 स्मार्टफोन बनवण्याची प्रोसेस जुन यांना खूप आवडते. त्यामुळे हा फोन त्यांचा आवडता फोन आहे. युनिबॉडी सेरामिकचे प्रत्येक तुकड्याला ७ दिवसांसाठी १४०० डिग्री सेल्सियसवर ठेवले जाते. तसेच स्मार्टफोन बनवण्यासाठी अन्य काही दुसरी प्रोसेस सुद्धा असतात. जुन यांच्या यादीत दुसरा फोन Mi 6 ब्राइट सिल्वर डिस्कवरी एडिशन आहे. शाओमीचे ग्रुपचे सीईओ यांनी म्हटले की, या फोनमध्ये व्हॅक्यूम – प्लेटेड ग्लास बॅक शेल देण्यात आला आहे. याचा वापर काचप्रमाणे केला जाऊ शकतो. ब्राइट स्टेनलेस स्टील फ्रेम या फोनमध्ये या फोनला खूप चांगला लूक येतो.

Mi Mix 2

maharashtra times

Mi 6

वाचाः रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, किंमत ९ हजारांपेक्षा कमी

maharashtra times

Mi 10 Pro

Mi 10 Pro मध्ये जबरदस्त एक्सपिरियन्स देण्यावर फोकस
शाओमी ग्रुपचे ली जुन यांनी Mi 10 Pro या स्मार्टफोनला आपला तिसरा आवडता फोन असल्याचे म्हटले आहे. हा फोन जगभरात उपलब्ध होणाऱ्या कंपनीचा पहिला फ्लॅगशीप स्मार्टफोन आहे. जुन यांच्या म्हणण्यानुसार, Mi 10 Pro स्मार्टफोन मध्ये कंपनीने किंमत कमी करण्यावर फोकस केला नाही. उलट, हाय-इंड स्मार्टफोन चाहत्यांना जबरदस्त एक्सपिरियन्स मिळावा यासाठी फोकस केला आहे. शाओमी, स्मार्टफोन्स शिवाय, अनेक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स घेऊन येत आहे. याला जगातील वेगवेगळ्या मार्केटमध्ये लाँच करण्यात येत आहे.

वाचाः गुगल प्ले स्टोरवर मिळाले १७ धोकादायक अॅप्स, तात्काळ डिलीट करा

वाचाः चीनच्या ब्रँड्सवर अशी मात करणार मायक्रोमॅक्स, लावा आणि कार्बन

वाचाःशाओमीने लपवले नाव, लिहिले ‘मेड इन इंडिया’

वाचाः फ्लिपकार्टवर सेल, १०००० ₹ पर्यंत डिस्काउंटSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Online Matka: ‘बासमती’वर मटक्याची बोली; लिलावाच्या आडून ऑनलाइन जुगार – mumbai police busts online matka racket

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मध्यमवर्गीय आणि विशेषतः कामगार वर्गाला कंगाल करणारा चिठ्ठीतील 'मटका' हळुहळू ऑनलाइन होऊ लागला आहे. लाल, पिवळ्या चिठ्ठीची जागा...

online education of divyang: ऑनलाइन शिक्षणासाठी दिव्यांगांना मोबाइल देणे शक्य नाही; सरकारची भूमिका – not possible to provide mobile for online education of divyang,...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना करोना काळात ऑनलाइन शिक्षण घेता यावे यासाठी एक वेळचा उपाय म्हणून मोबाईल हँडसेट द्यायचे ठरल्यास त्याचा...

pubg mobile global championship 2020: उद्यापासून पबजी चॅम्पियनशीप, १६ टीमचा सहभाग, ८.७८ कोटीचे बक्षीस – view complete details of pubg mobile global championship 2020,...

नवी दिल्लीःPUBG Mobile Global Championship 2020 उद्यापासून सुरू होणार आहे. भारतात पबजीला बंदी असली तरी पबजी लाँचिंगची चाहत्यांना फार उत्सूकता आहे. लवकरच रिलाँच...

Recent Comments