Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल Xiaomi smartphones: शाओमीने लपवले नाव, लिहिले 'मेड इन इंडिया' - xiaomi smartphones:...

Xiaomi smartphones: शाओमीने लपवले नाव, लिहिले ‘मेड इन इंडिया’ – xiaomi smartphones: ‘made in india’ branding seen on xiaomi stores, hid company logo


नवी दिल्लीः भारतातील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपला लोगो आणि साईन बोर्ड्सला ‘Made in India’ लोगोने कव्हर करणे सुरू केले आहे. शाओमीने आपल्या एक्सक्लूसिव्ह आणि मल्टी बँड सेलफोन स्टोर्सच्या बाहेर अधिकृत लोगोला अशा पोस्टर्सने लपवले जात आहे. तसेच दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही शाओमीच्या लोगोचा गणवेश घालू नका, असे सांगितले आहे.

वाचाः वनप्लस खरेदीवर ३ हजारांचा डिस्काउंट, आज दुपारी १२ वाजता सेल

कंपनीला देशात आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चीन विरुद्ध मोहीमेचा फटका बसू लागला आहे. दुकान आणि स्टोर्सला काही जण नुकसान पोहोचू शकतात, असा अंदाज आहे. कंपनीने लोगोला मेड इन इंडिया ब्रँडिंगने झाकण्याचा निर्णय घेतला आहे. इंडस्ट्री संबंधित लोकांनी ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशन (AIMRA) कडून चायनीज स्मार्टफोन ब्रँड्सला एक लेटर लिहून म्हटले की, त्यांची दुकाने आणि उत्पादनाला मिळणाऱ्या धमकीमुळे त्यांना ब्रँडिंग लपवावे लागत आहे.

या शहरात लपवले बोर्ड
ब्रँडच्या साईन बोर्ड्स रिटेलरच्या इन्सेटिव्ह असल्याने नुकसान पोहोचू शकते. शाओमीकडून दिल्ली, एनसीआर, मुंबई, चेन्नई, पुणे, आग्रा आणि पटणा या सारख्या शहरात रिटेल साईन झाकून ठेवले आहेत. तसेच कंपनीने त्या शहरात सुद्धा असे केले आहे. ज्या दुकाने आणि स्टोर्सला नुकसान पोहोचू अशा धमक्या मिळत आहेत. काऊंटरपॉइंट रिसर्चच्या माहितीनुसार, भारतात ८१ टक्के स्मार्टफोन्सवर चायनीज ब्रँड्सची भागीदारी आहे.

वाचाः फ्लिपकार्टवर सेल, १०००० ₹ पर्यंत डिस्काउंट


बाकी कंपन्यांनाही पत्र

AIMRA कडून शाओमी शिवाय, ओप्पो, विवो, रियलमी, वनप्लस, लेनिओ-मोटोरोला आणि हुवेई यांना पत्र लिहिले आहे. कंपन्यांना सांगितले आहे की, त्यांची ब्रँडिंगचे साईनबोर्ड हटवण्याचे किंवा लपून ठेवण्याची परवानगी देण्यात यावी. या पत्रात म्हटले की, अशा बोर्ड्सला नुकसान पोहोचवल्यास रिटेलर जबाबदारी घेणार नाही. कारण, या सध्याची परिस्थिती नियंत्रणात नाही. चीन विरोधी मोहीम संपेपर्यंत असे करण्यास कंपन्यांना परवानगी मागितली आहे.

वाचाः नोकियाची जबरदस्त ऑफर, एका स्मार्टफोनवर दुसरा फ्री

वाचाः गुगलने हटवले ३० अॅप, फोनमधून तात्काळ डिलीट करा

वाचाःफ्लिपकार्टवर सेलः स्मार्टफोन्सवर २० हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या सर्वकाहीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mumbai maximum temperature: मुंबईच्या तापमानात वाढ – mumbai weather : mumbai maximum temperature increases

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्याच्या काही शहरांत पहाटे अजूनही किंचितसा गारवा जाणवत असला तरी हळुहळू तापमान वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान...

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

Recent Comments