Home देश yes bank money laundering case: YES Bank: सर्वोच्च न्यायालयानं वाधवान बंधूंचा जामीन...

yes bank money laundering case: YES Bank: सर्वोच्च न्यायालयानं वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला – supreme court dismisses anticipatory bail plea of dhfl promoters in yes bank money laundering case


नवी दिल्ली : येस बँक घोटाळा प्रकरणी डीएचएफएलचे प्रर्वतक धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) आणि कपिल वाधवान (Kapil Wadhawan) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. सक्तवसुली संचालनालयाकडून (Enforcement Directorate) या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) १२ मे रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दोन्ही आरोपी चौकशीत सहकार्य करत नसल्याचं, उच्च न्यायालयानं यावेळी नमूद केलं होतं. या दोघांनी या आदेशाला आव्हान दिले होते.

न्यायाधीश संजय किशन कौल आणि बी. आर. गवई यांच्या खंडपीठाला वाधवान यांच्या वतीने अॅड. मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी सुनावणी दरम्यान सांगितले की, ते या याचिकेतील विनंतीवर जोर देत नाहीत. यांनतर खंडपीठाने चारही याचिका फेटाळल्या.

सध्या वाधवान बंधु सीबीआयनं दाखल केलेल्या एका वेगळ्या प्रकरणात अटकेत आहेत. ‘दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याने त्यांचा अटकपूर्व जामिनासाठीची अर्ज निरर्थक ठरतो,’ असे सक्तवसुली संचालनालयाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर न्यायमूर्ती संजय किशन कौल (Justices Sanjay Kishan Kaul) आणि न्यायमूर्ती बी आर गवई (Justices BR Gavai) यांच्या पीठानं वाधवान बंधुंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

वाचा :‘भारतीय महिला असं वागत नाहीत’, बलात्कार प्रकरणात न्यायालयाची टिप्पणी
वाचा :पतंजलीने ‘असं’ करायला नको होतं, सरकारने सुनावलं

चौकशीची गरज

कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा कट रचणं आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेचा छडा लावण्यासाठी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशीची गरज असल्याचं, अगोदर मुंबई उच्च न्यायालयानं जामीन याचिका फेटाळताना म्हटलं होतं.

येस बँक घोटाळ्यात धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांना एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली होती. या घोटाळ्याची सुरुवात जून २०१८ पासून सुरू झाली जेव्हा येस बँकेनं डीएचएफएलमध्ये ३७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली, असं सीबीआयनं आरोपपत्रात नमूद केलंय. या बदल्यात वाधवान बंधुंनी येस बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ‘डुइट अर्बन वेन्चर्स इंडिया प्रायवेट लिमिटेड’च्या नावावर ६०० कोटी रुपये दिले होते, असाही आरोप करण्यात आलाय.

वाचा :गणेशमूर्तीही चीनमधून आयात करण्याची गरज काय?, अर्थमंत्र्यांचा सवाल
वाचा :अंतराळ मोहिमांत खासगी क्षेत्राला परवानगी, इस्रोची घोषणाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: tractor rally : दिल्लीत हिंसक आंदोलन; केंद्राकडून गंभीर दखल, सिंघू सीमेवरून शेतकरी नेते ‘गायब’ – tractor rally violence in farmers protest signs...

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( farmers protest ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड...

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

Recent Comments