Home शहरं मुंबई young researcher dies: तरुण संशोधकाचा करोनाने मृत्यू; आईचा डॉक्टरांवर गंभीर आरोप -...

young researcher dies: तरुण संशोधकाचा करोनाने मृत्यू; आईचा डॉक्टरांवर गंभीर आरोप – young researcher from mumbai dies due to covid 19, mother alleges doctors irresponsible behaviour


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

रसायनशास्त्रात पीएचडी केलेल्या वैभव साबळे या अवघ्या ३४ वर्षीय तरूण संशोधकाचा करोनाने मृत्यू झाला. अतिशय गरीब परिस्थितीतून पुढे आलेल्या व भविष्यात रसायनशास्त्रात आणखी संशोधन करून भरीव कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या या तरुणाच्या मृत्यूने ‘यूआयसीटी’तील तज्ज्ञांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, वैभवचा मृत्यू हा केईएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे झाल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉमध्ये वैभवने नुकतीच रसायनशास्त्रात पीएचडी पूर्ण केली होती. त्याचा दीक्षांत समारंभ लॉकडाउनमुळे होऊ शकला नाही. वडाळा पूर्व येथील मनुरवाडी परिसरात आई आणि बहिणीसोबत एका चाळीत तो राहात होता. १४ मे रोजी तापाची लक्षणे जाणवू लागल्याने स्थानिक डॉक्टरकडे तो गेला. डॉक्टरानी त्याला रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. घरी आल्यानंतर तो भरपूर पाणी प्यायला. त्यानंतर त्याला आणखी त्रास होऊ लागल्यामुळे दाखल होण्यासाठी तो केईएममध्ये गेला.

लॉकडाउनमुळे कोणतेही वाहन मिळत नसल्याने तो चालत केईएमला पोहोचला. संध्याकाळी साडेसहा वाजता रुग्णालयात गेलेल्या वैभवला रात्री साडेबारा वाजता दाखल करून घेण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याचा एक्स रे काढण्यात आला. त्यात त्याच्या फुप्फुसात पाणी साकळले असल्याचे आढळून आले. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला त्याने आपल्याला ‘पिपरासेलीन टोझोबॅक’ या औषधाची अॅलर्जी असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतरही डॉक्टरने तेच अॅन्टीबायोटिक्स इंजेक्शन दिले. त्यानंतर त्याची प्रकृती खालावत जाऊन दोन तासांत त्याचा मृत्यू झाला, असे वैभवची आई कल्पना साबळे यांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.

रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याची करोना चाचणी (स्वॅब) करण्यात आली. मात्र तीन दिवसानंतरही अहवाल मिळाला नाही. त्यामुळे त्याला आपल्या जबाबदारीवर खासगी रुग्णालयात हलवण्याची तयारी कुटुंबीयांनी दर्शवली. डॉक्टरांनी त्यास परवानगी दिली नाही. अखेर १६ मे रोजी त्याचे निधन झाले. चाचणी अहवाल न आल्याने तब्बल पाच दिवस त्याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. वैभवच्या नातेवाईकांनी केईएमच्या प्रयोगशाळेत चौकशी केली, तेव्हा त्याचा स्वॅब प्रयोगशाळेत पोहचलाच नसल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली.

ही बाब त्यांनी रुग्णालय अधिष्ठात्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर २० मे रोजी मृतदेह ताब्यात देण्यात आला. त्यानंतर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रुग्णालयात प्रवेश घेतला, तेव्हा वैभवची प्रकृती चांगली होती. मृत्यू होण्यासारखी स्थिती नव्हती. अॅलर्जी सांगितलेली असतानाही डॉक्टरांनी अट्टाहासाने तेच औषध दिले. त्यात त्याचा मृत्यू झाला, असा दावा वैभवच्या आईने केला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitish Kumar rally: प्रचारसभेत ‘लालू यादव जिंदाबाद’च्या घोषणा; संतापलेले नितीशकुमार म्हणाले… – bihar election lalu yadav jindabad a group of people raising slogans in...

पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. तेजस्वी यादव १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात त्यावेळी जोरदार...

rcb vs kkr highlights: Royal Challengers Bangalore Beat Kolkata Knight Riders By 8 Wickets – IPL2020: विराट कोहलीच्या आरसीबीने मिळवला केकेआरवर मोठा विजय

अबुधाबी: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरबीसीच्या संघाने आजच्या सामन्यात केकेआरवर सहजपणे मोठा विजय मिळवला. केकेआरच्या फलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले होते....

Recent Comments