Home क्रीडा youngest to play last test: फक्त ५ दिवसाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर; १६...

youngest to play last test: फक्त ५ दिवसाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर; १६ व्या वर्षी खेळली अखेरची कसोटी! – debut at the age of 16 years 352 days pakistani cricketer khalid hasan played just one test for pak


इस्लामाबाद: क्रिकेट रेकॉर्डमध्ये कमी वयात केलेल्या कामगिरीचे विशेष कौतुक असेत. जसे की एखाद्या खेळाडूने कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेले पदार्पण, अथवा शतक होय. पण क्रिकेटच्या इतिहासात असा एक खेळाडू आहे ज्याच्या नावावर एक अजब विक्रम आहे. या खेळाडूच्या नावावर सर्वात कमी वयात अखेरची कसोटी खेळल्याचा विक्रम जमा आहे.

वाचा- पाकिस्तानचे करायचे तरी काय? करोना काळात केली मोठी चूक!

जागतिक क्रिकेटमध्ये असा एक खेळाडू आहे ज्याने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी अखेरची कसोटी खेळली होती. पाकिस्तानचा क्रिकेटपटू खालिद हसनने फक्त १६ वर्ष आणि ३५२ दिवस असताना अखेरची कसोटी खेळली. पाकच्या या खेळाडूने इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पण केले. तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम खालिदच्या नावावर होता. पण काळाच्या वेगात ते मागे पडले.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या हसन राजा यांच्या नावावर आहे. अर्थात त्यांच्या वयावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण अधिकृतपणे राजा यांच्या नावावर हा विक्रम आहे. त्यांनी १४ वर्ष २२७ दिवशी झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले.

वाचा- टिकटॉक शिवाय इंटरनेट म्हणजे…; भारतीय खेळाडूचे ट्विट व्हायरल!

खालिद हसन यांच्या नावावर सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम भलेही नसला तरी एक विक्रम मात्र आजही त्यांच्या नावावर आहे. कदाचीत हा विक्रम त्याच्या नावावर असावा अशी त्यांची इच्छा नसावी.

पाकिस्तानकडून फक्त एक कसोटी सामना खेळलेल्या खालिद हसन यांचे कसोटी करिअर फक्त ५ दिवसांचे राहिले. १६ वर्ष ३५२ दिवशी त्यांनी पदार्पण केले आणि १६ वर्ष ३५६ व्या दिवशी ते संपले देखील. सर्वात कमी वयात करिअर संपणारे ते क्रिकेटपटू आहेत.

वाचा- सचिन,विराट, धोनी नव्हे तर ‘हा’ आहे भारताचा मैल्यवान खेळाडू!

खालिद यांचा जन्म १४ जुलै १९३७ रोजी पेशावर शहरात झाला. त्यांनी एकमेव कसोटी सामन्यात १७ धावा केल्या. यात दोन विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्यांनी प्रथम श्रेणीत १७ सामन्यात ११३ धावा आणि २८ विकेट घेतल्या. ३ डिसेंबर २०१३ रोजी त्यांचे लाहोर येथे निधन झाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Atal Bus Service: पुणेकरांसाठी खूषखबर! पाच किलोमीटरचा प्रवास आता फक्त ५ रुपयांत – bjp leader chandrakant patil inaugurates atal bus service in pune

पुणे: 'पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 'अटल' बस सेवेला आज सुरुवात झाली. या अंतर्गत पुणेकरांना पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास अवघ्या ५ रुपयांत करता येणार आहे....

cm uddhav thackeray: शेतकऱ्यांसाठी हवेत २४०० कोटी – marathwada farmers needs 2400 crore from package cm uddhav thackeray declared yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटी रुपयांचे 'पॅकेज' जाहीर केले असून, त्यातून मराठवाड्यासाठी २४०० कोटी रुपये...

chandrakant patil: खडसेंबद्दल विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले… रात गयी, बात गयी! – bjp leader chandrakant patil on eknath khadse

पुणे: भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बोलणं टाळलं. 'रात गयी,...

Recent Comments