Home शहरं नागपूर yuva sena district president: युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखाने मागितली ८ लाखांची खंडणी,...

yuva sena district president: युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखाने मागितली ८ लाखांची खंडणी, भावाला रंगेहात अटक – yuva sena district president demands 8 lakhs extortion brother arrested


नागपूरः शिवसेनेचे शहर प्रमुख मंगेश कडव यांच्यावर २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप होत असतानाच आता युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखाने सावकाराकडे आठ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली. अजनी पोलिसांनी सिनेस्टाइल सापळा रचून युवा सेनेचा जिल्हा प्रमुख विक्रम राठोड याचा भाऊ व विभाग प्रमुखाला शनिवारी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संजोग सुरेश राठोड (वय ३४,रा. अध्यापकनगर, हुडकेश्वर) असे खंडणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आता विक्रम राठोड याचा शोध घेत आहेत.

महबूब पाशा शेख अब्दुल गफ्फार शेख (वय ३५, रा. पारडी) हे परवानाधारक सावकार आहेत. गणेशपेठ परिसरात त्यांचे कार्यालय आहे. दहा दिवसांपूर्वी विक्रम याने महबूब यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘तू अवैध वसुली करीत आहे. तुझा भांडाफोड करणार आहे. काम सुरळीत सुरू ठेवण्याकरिता १५ लाख रुपये दे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील. माझी मुंबईत ओळख असून, तुझा परवाना रद्द करेल’, अशी धमकी विक्रम याने सावकाराला दिली. एवढी रक्कम देण्यास सावकाराने असमर्थता दर्शविली. त्यानंतर विक्रम याने आठ लाख रुपये मागितले. पाच लाख रुपये शनिवारी व उर्वरित तीन लाख रुपये सोमवारी देण्याचा दम विक्रमने दिला. तसेच सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पैसे घेऊन सावकाराला मेडिकल चौकात बोलाविले. शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास सावकाराने अजनी पोलिस स्टेशन गाठले. विक्रम याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिस तक्रार लिहित असतानाच विक्रम याने सावकाराच्या मोबाइलवर संपर्क साधला.

नवरा टीव्ही घेत नसल्यानं मुलांना विष पाजून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

करोनाचे भय संपेना! विलगीकरण कक्षात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सावकाराने पोलिसांना सांगितले. अजनी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. दोन पोलिस सावकाराच्या एमएच-४९-बीबी-३८४८ या क्रमांकाच्या कारमध्ये बसले. सावकारासह कारने मेडिकल चौकात गेले. विक्रम याने पुन्हा सावकाराच्या मोबाइल संपर्क साधला. ‘मेडिकल चौकाजवळील शांती निकेतन शाळेजवळ माझा माणूस पैसे घ्यायला येईल, तू तेथे पोहोच’,असे सांगितले. सावकार हा पोलिसांना घेऊन कारने शांती निकेतन शाळेजवळ गेला. याचवेळी एमएच४९-बीएफ-०७३३ या क्रमांकाच्या मोपेडने संजोग तेथे पोहोचला. सावकाराला पैशाची मागणी करताच पोलिसांनी संजोग याला अटक केली. पोलिसांनी विक्रम व संजोगविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. विक्रम हा पसार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kitab-i-Nauras book: सांगीतिक मूल्यांचा ऐतिहासिक ग्रंथ – dr balasaheb labade book review on kitab-i-nauras book

डॉ. बाळासाहेब लबडे'किताबे नवरस' हा मूळ विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिलशहा दुसरा याने दखनी भाषेत लिहिलेला ग्रंथ. या ग्रंथाचा डॉ. सय्यद याह्या नशीत यांनी...

फोटो काढण्याच्या नादात महिलेने गमावला जीव

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ल्यावर कुटुंबीयांसह फिरायला आलेल्या महिलेचा किल्ला चढतेवेळी फोटो काढताना पाय घसरून दगडावर पडल्यने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी...

India vs Australia: ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला झाला दंड; केली ही चूक! – india tour of australia 2020 india vs australia team india fined for...

सिडनी: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला पहिल्यास सामन्यात पराभव स्विकारावा लागला. सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला आणि...

Recent Comments