Home क्रीडा yuvraj singh made comment against dalits: युवराज सिंगच्या अडचणी वाढणार? गुन्हा दाखल...

yuvraj singh made comment against dalits: युवराज सिंगच्या अडचणी वाढणार? गुन्हा दाखल करण्याची मागणी! – yuvraj singh made comment against dalits seems to be stuck in the case


हांसी: लाइव्ह चॅटमध्ये जातिवाचक शब्द वापरल्यामुळे भारताचा माजी अष्ठपैलू खेळाडू युवराज सिंगने अडचणीत आला आहे. काल दिवसभर युवराज विरुद्ध सोशल मीडियावरील हॅशटॅग आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात युवराजवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

वाचा- धोनीने खरेदी केला टॅक्टर; पाहा व्हिडिओ!

दलित समाजावर युवराजने केलेल्या वक्तव्यावर आता रजत कलसन यांनी हरियाणातील हांसी येथील पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. कलसन हे दलित अधिकाराचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनुसुचित जाती व जमाती अत्याचार अधिनियमन नुसार युवराजवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

वाचा- एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज!

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर युवराज सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत युवराज सिंग लाइव्ह चॅटमध्ये रोहित शर्माशी बोलत आहेत. त्यात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या संदर्भात बोलताना गंमतीने एक कमेंट केली. युवराजने जातीवाचक शब्द वापरल्याने सोशल मीडियावर #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला होता.

आम्ही हांसीच्या पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली असून युवराज सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. युवराज सिंगने केलेले वक्तव्य संपूर्ण देशातील लोकांनी पाहिले असल्याचे कलसन म्हणाले. यामुळे दलित समाजाची भावना दुखावली आहे, असे ते म्हणाले.

वाचा- एका मृत्यूने क्रीडाक्षेत्रात ढवळून निघाले

पोलिस अधिक्षक कार्यालयाने युवराज सिंग विरुद्धची तक्रार संबंधित शहर पोलिस ठाण्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवली आहे. दरम्यान युवराज विरुद्ध गुन्हा दाखल केला नाही तर मोठे आंदोलन करू असा इशारा कलसन यांनी दिला आहे.

रोहितसोबत बोलताना युवराजने या दोन क्रिकेटपटूंबद्दल गंमतीने जातीवाचक शब्द वापरले. हा शब्द वाल्मिकी समाजाबद्दल होता. आता यावरून सोशल मीडीयावर युवराजने माफी मागावी अशी मागणी केली जात होती. चॅटमध्ये युवराज आणि रोहित दोघे फिरकीपटू चहलच्या टिकटॉक व्हिडिओवर बोलत होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

chandrakant patil: Chandrakant Patil: ‘चंद्रकांत पाटील नावाची गोळी… विरोधकांना ‘हा’ डोस घ्यावाच लागतो!’ – chandrakant patil targets shiv sena and maha vikas aghadi

पंढरपूर: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीवर हल्ले...

Raghu: India vs Australia: भारतीय संघातील एक सदस्य झाला ‘गायब’? करोनाच्या चुकीच्या रिपोर्टमुळे झाला घोळ… – team india’s throw down specialist raghu’s corona test...

सिडनी, India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा सराव सुरु झाला आहे. पण या दौऱ्यात भारतीय संघातील एक सदस्य अजूनही सरावाला आलेला...

Shahrukh Khan Snapped Near Gateway Of India In Mumbai – तो बघ शाहरुख! बदललेल्या लुकमुळे किंग खान बाजूने चालत गेल्याचंं कोणाला कळलंच नाही

मुंबई- बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे चाहते तो मोठ्या स्क्रीनवर परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलमध्ये त्याचा नवीन लुक समोर आल्यानंतर चाहते...

Recent Comments